संगमनेर । झुंजार न्यूज

 
संगमनेर शहर पोलीस व अधीक्षकांच्या पथकाने संयुक्त छापा टाकत  संगमनेर खुर्द येथील मोठा जुगार अड्डा बुधवारी रात्री  उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी २३ हजार रुपयांच्या रोकडसह एकूण तीन लाख २६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तिरट नावाचा जुगार खेळताना दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्या सर्वांवर मुंबई जुगार अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (दि ४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला. संगमनेर खुर्द शिवारातील जुन्या संगमनेर-पुणे रस्त्यावर आडोशाला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार सुरु होता. खबर्याने माहीती देताच ही कारवाई करण्यात आली. 
पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास या शेडवर छापा घातला त्यावेळी तेथे तिरट नावाचा हारजीत असलेला तीन पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे व घोळक्याने बसलेल्या लोकांच्या मध्यभागी रोख रक्कम ठेवलेली असल्याचे पोलिसांना दिसले. त्या सर्वांना त्याच स्थितीत उभे राहण्याचे आदेश देत पोलिसांनी जुगारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साहित्यासह २३ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगार खेळताना आढळून आलेल्या दहा जणांचे मोबाईल व दुचाकी असा एकूण  तीन लाख २६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी जुगार खेळताना शुभम गोपाल शाहू (वय २८, रा. साईनगर, ), प्रशांत एकनाथ जोर्वेकर (वय ४५ रा. जोर्वेरोड), राजेंद्र मल्लू गायकवाड (वय ४६ रा. शिवाजीनगर, ), वसंत दुर्गा शिंदे (वय ५१ रा. रायतेवाडी फाटा), दशरथ शिवराम भुजबळ (वय ५१ रा. इंदिरानगर, संगमनेर), बाळासाहेब भीमा मांडे (वय ४२) व नवनाथ कारभारी पानसरे (वय ४८ दोघेही रा. जाखुरी), जुबेर नवाब शेख (वय ५० रा. वॉर्ड क्र. एक, श्रीरामपूर), दिनेश श्याम जाधव (वय ३५ रा. अकोले नाका) व अनिल एकनाथ राक्षे (वय ४७ रा. संगमनेर खुर्द ) अशा एकूण दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्याच्या कलम नुसार  कारवाई करण्यात आली. शहरात आजही तेली खुंट चौक, सय्यद बाबा काँर्नर सह इतर ठिकाणी राजरोसपणे जुगार व मटका खेळला जात आहे .पोलिस मात्र त्याचेवर कारवाई करत नाही. 
चौकट
इतर ठिकाणी कारवाईस  टाळाटाळ  ?
शहरात ठिकठिकाणी आजही राजरोसपणे मटका जुगार खेळला जात आहे. पोलिसांचा आशिर्वाद  असल्याने कारवाई करण्याचे धाडस उप अधिक्षक सोमनाथ वाकचौरे पो .  नि भगवान मथूरे दाखवत नाही. पारंपारिक आमचा व्यावसाय असल्याचे सांगत या  कामी पत्रकाराच पुढाकार घेत आहे. 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *