संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा स्व. संभाजीराजे थोरात फाऊंडेशनचे संस्थापक श्री . रविंद्र संभाजीराव थोरात यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून निवड करण्यात आली .

भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ,भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. गणेशजी भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश किसान मोर्चाचे प्रभारी व राज्य भाजपचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर , तसेच प्रभारी ज्ञानोबाजी (भाई) मुंडे यांच्या संमतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे .

या कार्यकारणीत संगमनेर येथील रविंद्र संभाजीराव थोरात यांची प्रदेश सचिव पदी म्हणून निवड करण्यात आली . रविंद्र थोरात हे गेली अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीत कार्यरत आहे . या पुर्वी त्यांच्याकडे किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपद होते त्या माध्यमातुन त्यांनी संपुर्ण जिल्हयात युवकांचे संघटन केले . तसेच स्व. संभाजीराजे थोरात फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक चळवळ उभी केली . त्याच्या आक्रमक व कार्यक्षम वृत्तीमुळे मोठया प्रमाणात युवकांची फळी उभी राहीली . अनेक मोर्चे , आंदोलने करुन सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्याच्या या कार्याची वरिष्ठांनी दखल घेतली व त्याच्यावर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदीची जबाबदारी दिली .

त्याच्या निवड झाल्याबद्दल त्यांचे महसूलमंत्री राधाक ष्ण विखे पाटील , खा डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले
