संगमनेर । झुंजार न्यूज
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखालील रयत क्रांती पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी संगमनेरचे भिवा राणु सोन्नर यांची नियुक्ती करण्यात आली या आशयाचे पत्र माजी मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या हस्ते देण्यात आले .
रयत क्रांती पक्ष हा संपूर्ण राज्यात बळकटीला आणण्यासाठी सदाभाऊ खोत हे दौरे करत असून गावो गावी या पक्षाशी शेतकरी , युवक , महीला सह छोटे – मोठे कार्यकर्ते जोडले जात आहे . भविष्यात होणार्या निवडणुकामधून नविन कार्यकर्त्याना काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे खोत म्हणाले .
यावेळी प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे , शिवनाथ जाधव , दिपक भोसले , सतिष पवार आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
चौकट
सदाभाऊ खोत यांनी माझ्यावर रयत क्रांती पक्षाच्या अहमदनगर जिल्हाची जबाबदारी सोपविल्याने पक्ष वाढीकरिता तन – मनाने काम करुन सर्व समाज्यातील तळागाळातील लोकांना जोडून भविष्यात होणार्या कार्यकर्त्याना संधी देवून सर्व निवडणुका ह्या स्वबळावर लढविणार
भिवा सोन्नर ( नूतन जिल्हाध्यक्ष )
