जयहिंदची मुंबईत तीन दिवसीय ग्लोबल कॉन्फरन्स संपन्न
राज्यभरातून 300 कृतिशील युवकांचा सहभाग
संगमनेर । झुंजार न्यूज
भारतीय राज्यघटना ,समृद्ध लोकशाही, भारताची एकात्मता व संपन्नता अधिक समृद्ध व्हावी याकरता कार्य करत असलेल्या जयहिंद लोक चळवळीने अहमदनगर जिल्ह्यातून थेट मुंबईमध्ये भरारी घेताना जागतिक ग्लोबल कॉन्फरन्सचे अत्यंत यशस्वी आयोजन केले असून यामध्ये राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून 300 कृतिशील युवकांनी सहभाग घेतला . कृषी, रोजगार, पर्यावरण, व्यवसाय , शिक्षण शिक्षण,संविधान या चर्चासत्रामध्ये सहभाग घेताना हा निकोप समाज निर्मितीचा मंत्र राज्यभरातील प्रत्येक गाव खेड्यात जाणार असून जयहिंद लोकचळवळीची व्याप्ती वाढणार आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ सुधीर तांबे व युवा नेते आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून चौथी इंटरनॅशनल ग्लोबल कॉन्फरन्स संपन्न झाली. यामध्ये अमेरिका अफगाणिस्तान नेदरलँड यांसह भारतातील विविध क्षेत्रातील तज्ञांनी सहभाग घेऊन 300 कृतिशील युवकांशी संवाद साधला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विचारांवर कार्य करत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून मागील 22 वर्षे निकोप निरोगी समाज निर्मितीचे कार्य होत आहे. या लोक चळवळीने आता ग्लोबल स्वरूप धारण केल्या असून प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात पोहोचणार आहे.
या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये आंतरराष्ट्रीय आरोग्यतज्ञ डॉ रवी गोडसे, निल गायकवाड, श्रीगौरी सावंत ,यांच्यासह जैन इरिगेशनचे संचालक अशोक जैन, महात्मा गांधी फाउंडेशन चे कार्यकारी संचालक प्रसाद गोलनपल्ली अफगाणिस्तान मधील मैदान शहराच्या माजी महापौर झरिफा गफारी यूएसए मारलबोरोचे नगराध्यक्ष जुनेद काझी, यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विषयांवर मार्गदर्शन केले तर सदृढ लोकशाही वर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, हिरालाल पगडाल , अमेरिकेमधून सुरज गवांदे, डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, उत्कर्षताई रुपवते , खालीद पठाण ,सुनील रोहकले, अरुणाझ हाथीराम यांनी मार्गदर्शन केले. तर शिक्षण व्यवस्थेवर आमदार सत्यजित तांबे, डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,शैलेंद्र शर्मा, हरिहरन अय्यर, देविता सराफ यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे व माजी कृषिमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या प्रगतशील 13 शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राजकारण विरहित समाजकार्य करणाऱ्या जयहिंद लोकचळवळीने सुसंस्कृत पिढी घडवण्याचे काम केले असून राज्यभरातील तरुणांसाठी हे व्यक्तिमत्व विकासाचे मोठे व्यासपीठ असल्याचे गौरवदगार काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले तर जयहिंद लोक चळवळीने शेतकऱ्यांना केलेल्या सन्मानामुळे युवक शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून शेतीला पुन्हा वैभवाचे दिवस येतील असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला..
आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या ग्लोबल कॉन्फरन्सने राज्यभरातील युवकांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून खेडोपाडी निकोप व निरोगी सदृढ समाज निर्मितीचा मंत्र घेऊन जाण्याची शपथ घेतली.
चौकट
मुंबईत यशस्वी आयोजन
संगमनेर सारख्या ग्रामीण भागात सुरू झालेल्या जयहिंद लोकचळवळीने आपले कार्य अहमदनगर जिल्ह्यात वाढवले. मागील तीन वर्षापासून ग्लोबल कॉन्फरन्सच्या माध्यमातून काम होत असून मुंबईमध्ये झालेल्या यशस्वी आयोजनामुळे जयहिंद लोकचळवळीची व्याप्ती राज्यभरात वाढणार आहे .या यशस्वी आयोजनाची राज्य ,देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध सेवाभावी संस्थांनी कौतुक केले आहे
