संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व पठार भागातील असणार्या खरशिंदे गावांतील स्वत:च्या मालिकीच्या असणार्या जागेवर अतिक्रमण होवून बांधलेल्या घराची बोगस नोंद रद्द होण्याबाबत २५ वर्षाच्या युवकांने सुरु केलेल्या आमरण उपोषण पचायत समिती आधिकारी व सामाजिक कार्यकर्त्याच्या मध्यस्तीने सुटले
मोसिन रशिद शेख यांनी आपल्या ५८ / ८ मध्ये केलेल्या जागेत अतिक्रमण झाले असल्याचे पुराण्यानुसार ग्रामपचायतीस वेळो – वेळी लेखी तक्रार केली मात्र याबाबत ग्रामपचायतीकडून कुठलीचं कारवाई न झाल्याने मोसिन रशिद शेख यांनी अखेर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्यानुसार मंगळवार दि १० आक्टोबर २०२३ रोजी मोसिन शेख यांनी ग्रामपचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले मंगळवार या दिवशीय संपूर्ण दिवसभर उन्हात उपोषण सुरु ठेवल्याने रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांना तहसिलदार व गटविकास आधिकार्यांना याबाबत माहिती दिल्याने दुसर्या दिवशी तत्काळ सहाय्यक गट विकास अधिकारी वायाळ व विस्तार अधिकारी डोखे यांनी घटना स्थळी धाव घेत उपोषणकर्ते मोसिन शेख यांची बाजू ऐकूण घेत तातडीने जागेचा पंचनामा करुन झालेले अतिक्रमण हटविण्याकरिता नोटिसा दया , घराच्या झालेल्या बोगस नोंदणी रद्द करण्यात येईल आदीसह उपोषणकर्त्यानी मांडलेल्या विविध समस्यांचे निवारण करण्याचे लेखी आश्वासन सहाय्यक गट विकास अधिकारी वायाळ , विस्तार अधिकारी डोखे , संरपच सौ सविता वाडेकर , रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके , मानवधिकार संघटनेचे अध्यक्ष अमोल राखपसरे , सहाय्यक पो नि शिवाजी पवार , ग्रामसेवक के पी कराळे यांच्या हस्ते मोसिन शेख यांना लिंबू पाणी व लेखी पत्र देवून उपोषण सोडविण्यात आले . यावेळी रमेश भोसले , रावसाहेब गागरे , कासमभाई शेख आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी पचायत समितीच्या आधिकारी , संरपच , ग्रामसेवक व ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका दाखवून अन्यायग्रस्त उपोषणकर्ता मोसिन शेख या कार्यकर्त्याला न्याय दिल्याने आशिष शेळके यांनी आभार मानले
यावेळी डॉ चंद्रकांत शिंदे व त्यांच्या सहकार्यानी वेळो – वेळी मोसिन शेख यांची तब्येतची तपासणी केली व शरीरातील पाण्याची कमतरता कमी पडू नये म्हणून सलाई दिले .
चौकट
दिड दिवसाच्या उपोषणात गावांतील ८७ लोकांनी आपला पाठिंबा दर्शविल्याने लोक आता अन्यायाच्या विरोधात जागृत होवू लागल्याचे चित्र दिसून आले .
Post Views: 1,205
