आश्वी | झुंजार न्यूज
साहेब दोन – तीन पिढ्या झाल्या तरी निळवंडे कालव्यातून पाणी येईना , आता तुम्हीचं काही तरी करा या वयोवृद्ध लाभधारी शेतकऱ्यांनी उद्गगारलेल्या वाक्यावरून घाबरु नका एवढी वर्ष थांबले आता फक्त दोनचं महीने प्रतिक्षा करा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी देवून तुमचे स्वप्न साकार करणार असे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले .

निळवंडे धरणातून डाव्या कालव्याद्रारे दुष्काळी भागांना ना विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले यावेळी अकोले येथे उजव्या कालव्यातूनही पाणी सोडा याकरिता काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्या आंदोलनाच्या सामोरी जावून ना विखे पाटील यांनी ३० आक्टोबर पर्यत पाणी सोडू असे आश्वासित केल्याने ही बातमी वार्या सारखी पसरली त्यामुळे उजव्या कालव्यांच्या लाभधारी शेतकर्यांनी विखे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले .

नगरला कार्यक्रमाला जाताना ना विखे यांनी उजव्या कालव्या पाहणी करत जाण्याचा निर्णय घेवून बहुतांश ठिकाणी कामाची पाहणी केली तर काही ठिकाणी शेतकर्यांची गा-हाणी ऐेकूण घेत आधिकारी , ठेकेदार यांना सूचना देत राहिलेली कामे तातडीने करा असे सागितले . संगमनेर , जाखुरी , अंभोरे येथे कार्यकर्त्यानी मोठ्या जल्लोषात स्वागत केले तर मालुंजे फाटा येथील संदिप घुगे यांच्या निवासस्थानी थांबून शेतकर्यांशी संवाद साधला यावेळी प स माजी सदस्य निवृत्ती सांगळे , तबाजी मुन्तोडे , माजी संरपच संदिपराव घुगे , पानोडी माजी उपसंरपच अशोक तळेकर , सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे , रिपाई तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम , विखे कारखान्याचे माजी संचालक जेहूरभाई शेख , आण्णासाहेब म्हस्के , डिग्रस संरपच अशोक खेमनर , प्रदिपराव घुगे , पुंजा पा नागरे आदीसह शेडगांव , मालुंजे , पानोडी , डिग्रस , हंगेवाडी , शिबलापूर येथील कार्यकर्त्यांनी स्वागत केले . तर पिंप्री लौकी फाटा येथे उजवा कालवा कृती समितीचे अध्यक्ष भारतराव गीते , अॅड पोपटराव वाणी , रमेश गीते , प्रा कान्हू गीते , दौलत दातीर , अनुप कदम , अनिल गीते , भाऊसाहेब मुंढे , सिताराम दातीर , भाऊसाहेब लावरे , दाढ खुर्द संरपच सतिष जोशी , नारायण कहार आदीसह लाभधारी शेतकर्यांनी स्वागत केले .

गेल्या ६० वर्षापासून निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतकरी पाण्याची प्रतिक्षा करत आहे त्यात या वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने पाण्याची मोठी टंचाई निर्माण होणार असल्याने त्यात विखे पाटील यांनी सकारात्मक पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने शेतकर्यांमध्ये आशा पल्लवीत होवू लागल्याचे चित्र दिसत आहे .
