संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुका व राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्याने कार्यरत असलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठीची अद्यावत सुविधा कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी श्रीराम कु-हे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना श्रीराम कु-हे म्हणाले की, विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वखाली व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने जनतेच्या मदतीकरता काम केले जात आहे. हे कार्यालय तालुक्यातील जनतेचे खऱ्या अर्थाने मदत केंद्र ठरले आहे.नागरिकांसाठी विविध योजनांची ऑनलाईन माहिती भरणे कामी या कार्यालयाने सातत्याने मदत केली आहे .यापूर्वीही कोरोना संकट, ऑनलाईन फॉर्म भरणे, पीक कर्जमाफी, अशा विविध कामांमध्ये नागरिकांना ऑनलाइन कामांची मदत झाली आहे.

तालुक्यात पाच नोव्हेंबर रोजी सात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या ग्रामपंचायतींमध्ये इच्छुक उमेदवारांना अर्ज भरणे प्रक्रिया सोपी व ऑनलाइन सुविधा देण्याकरता स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरणे, दहा संगणक व दहा तज्ञ हे नागरिकांना मदत करणार आहेत. 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 23 या काळामध्ये नामनिर्देश पत्र दाखल करता येणार असून 25 ऑक्टोबर पर्यंत माघार घेतली जाणार आहे .पाच नोव्हेंबर रोजी तालुक्यातील अश्वि बुद्रुक, आश्वी खुर्द, घारगाव, गुंजाळवाडी ,पिंपळगाव कोंझिरा ,बोरबन, ढोलेवाडी या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. तसेच तालुक्यातील सात ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूक होत आहेत.

तरी या ग्रामपंचायतसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे ,झेरॉक्स प्रति सह घेऊन यशोधन कार्यालयात मदतीकरता संपर्क साधावा असे आवाहन यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
