मुंबई | झुंजार न्यूज
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते आज दहिसर पूर्वेतील केटकीपाडा दहिसर चेकनाका येथील डीपी रोड चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग असे नामकरण करण्यात आले.या सोहळ्यास स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) चे युवक आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी 2014 पासून सातत्याने पाठपुरावा करून व आ.प्रकाश सुर्वे यांच्या सहकार्याने या मार्गाचे आज नामकरण करण्यात आले.

मा.ना. रामदास आठवलेंच्या हस्ते दहीसर चेकनाका येथील दहिसर टेलिफोन एक्सचेंज ते वैशालीनगरपर्यंत नविन डि.पी. रोडचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण मा.ना. रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

दहिसर चेकनाका मार्ग,दहिसर टेलिफोन एक्सेंज ते वैशाली नगर पर्यंत नविन डि.पी. रोडचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण करण्यासाठीआमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई प्रदेशाध्यक्ष युवक यांच्या सोबत शिवसेना वार्ड.क्र.3 चे शाखा अध्यक्ष प्रकाश पुजारी , समाजसेवक प्रदीप नायर यांनी प्रयत्न केले.

याप्रसंगी महानगरपालिका परिमंडळ 07 उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, सहायक्क आयुक्त उत्त्तर /आर श्री. नयनीश कृ . वेंगुर्लेकर, रिपाई महिला आघाडी महाराष्ट्र सरचिटणीस अॅड अभयाताई सोनवणे , मुंबई अध्यक्षा महिला आघाडी उषाताई रामलू ,मुंबई उपाध्यक्ष परशुराम माळी इ.रिपाईचे व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
