आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्टया प्रतिष्ठेच्या असणार्या आश्वी बु॥ ग्रामपंचायत पंचवार्षीक निवडणूकीसाठी राज्याचे महसुल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी लढाई प्रतिष्ठेची करत समोरा – समोर उभे राहिल्याने ही निवडणुक दुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहे.
आश्वी बु सारख्या व्यापारी गावांला सरपंच पद अनुसुचित जमातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित झाले . या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकानी उड्या घेत अखेरच्या दिवशी विखे – थोरात कार्यकर्त्याकडून सदंस्य पदासाठी ८६ तर सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले . अर्ज माघारीच्या दिवशी २५ ऑक्टोबरला निवडणूकीचे संकेत मिळतील .
मागील पंचवर्षीकला माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात गटाची ग्रामपंचायतीवर संत्ता होती. पुन्हा सत्ता मिळविण्याकरिता थोरात गट सरसावले तर महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील गटाचे कार्यकर्ते ही सत्तां आपल्याकडे खेचण्यासाठी मैदानात उतरवले आहे.

१५ जागाकरिता प्रभागनुसार अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे..
प्रभाग १ :– आलम कासम शेख, विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे, चांद अहमद शेख, अमोल ज्ञानेश्वर वाकचौरे, रमेश मधुकर धर्माधिकारी, प्रशांत प्रकाश कोळपकर, राहुल बाबुराव जऱ्हाड, अझरुद्दीन सिकंदर शेख, बाळाराम भीमाशंकर सांगळे, अरुणा विजय उर्फ पांडुरंग हिंगे, सुनिता सुनील गायकवाड, राजश्री सोमनाथ गाडेकर, शोभा प्रविण ताजणे, स्नेहल सतिष जाधव, जयश्री विजय केदारी, प्रतिष्ठा रमेश गायकवाड, शांता विजय ब्राम्हणे, शितल अमोल गायकवाड, शितल दिलिप बोरुडे
प्रभाग २ :- अण्णासाहेब काशीनाथ जऱ्हाड, विशाल विनायक पाटील, भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर, बाळकृष्ण ठकाजी होडगर, राहुल बाबुराव जऱ्हाड, योगेश वसंत पिलगर, भाऊसाहेब रंगनाथ पिलगर, सुरेखा दत्तात्रय पंडित, प्रतिक्षा रमेश गायकवाड, प्रियंका राजु पिलगर, प्रिती आंतोन गायकवाड, मीना आंतोन गायकवाड, शीला सुखदेव गायकवाड, राधा योगेश पिलगर, रोहिणी राजकुमार जऱ्हाड, अलका भाऊसाहेब खेमनर, सविता महेंद्र जऱ्हाड, सारीका विशाल पाटील
प्रभाग ३ :– विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे, बबन भाऊराव शिंदे, बाळासाहेब उर्फ दामोदर नानासाहेब मदने, रविंद्र शिवाजी गायकवाड, विजय काशीनाथ म्हसे, रविंद्र मधुकर म्हसे, राहुल बाबुराव जऱ्हाड, कोमल शंकर माळी, भीमाबाई पांडुरंग यशवंत, भीमबाई भास्कर मोरे, ताई लक्ष्मण मोरे, उषा महेंद्र माळी, अंकुश काशीनाथ घोडके, विजय दादा केदारी, अनिल राधाकिसन कगंणकर, सागर लक्ष्मण घोडके
प्रभाग ४ :- बबन भाऊराया शिंदे, सोमेश्वर प्रभाकर गायकवाड, जानकीराम बबन गायकवाड, सुभाष भिकाजी चतुरे, विजय उर्फ पांडुरंग जगन्नाथ हिंगे, अविनाश गिताराम गायकवाड, ठकाजी बंडू ताजणे, वेणूनाथ तात्याबा गायकवाड, गोरक्षनाथ पांडुरंग म्हसे, किशोर शिवाजी शिंदे, पुजा किसन हतांगळे, कुसुम राधु साळवे, कविता जानकीराम गायकवाड, मनिषा माधव शिंदे, नंदिनी सुभाष चतुरे, शीला शिवाजी हिंगे, पुजा राहुल राखपसरे
प्रभाग ५ :- अभिजित शंकर ताजणे, अमोल बाबासाहेब गायकवाड, संतोष रामदास ताजणे, वैभव एकनाथ ताजणे, दीपक उत्तम गायकवाड, किशोर शिवाजी शिंदे, महेश बाळासाहेब गायकवाड, प्रविण राधुजी गायकवाड, दर्शना संतोष ताजणे, सुरेखा शंकर ताजणे, सायली प्रसाद ताजणे, माधुरी संदीप ताजणे, परीगा बाबासाहेब गायकवाड, शितल अमोल गायकवाड, दिपिका रमेश गायकवाड, मीना प्रकाश गायकवाड यांनी सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी नामदेव किसन शिंदे, तान्हाजी रघुनाथ नांगरे, दीपक तुकाराम बर्डे, महेंद्र सुर्यभान माळी, दत्तात्रय भागवत पवार, रविंद्र सुभाष बर्डे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .
आश्वी बु॥ गांवांची ५ हजार ४०६ एकूण मतदान असून सदंस्य पदासाठी ८६ उमेदवार तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली असून बुधवार दि २५ ऑक्टोबर रोजी माघारी असून या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
तर निवडणुकीतील अर्जाची छाननी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल. उमेदवारी अर्ज २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यत मागे घेता येईल. यांचं दिवशी चिन्ह वाटप होणार असून मतदान ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत पार पडणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.
