संगमनेर । झुंजार न्यूज
सह्याद्रिच्या पर्वत रांगेत,आम्लेश्वराच्या पायथ्याशी वसलेले अतिशय दुर्गम डोंगराळ भागात अंभोरे हे गाव!.. तर अंभोरे हे गाव महान संताची आणी ऐतिहासिक परंपरा लाभलेले गावापैकी एक …

संगमनेर तालुक्यातील अंभोरे गावातील देशमुख परिवारातील प्रगतशिल शेतकरी आदरणीय विजयसिंह उर्फ बाळासाहेब देशमुख अंभोरकर साहेब यांचे कुटंबात श्री.रणजितसिंह यांचा जन्म झाला. विश्वाला श्रध्दा आणी सबूरीचा मंत्र देणारे श्री.साई बाबा… साईबाबांचे चरित्रातिल प्रमुख नायक खाशाबा देशमुख, नायिका त्यांची (बहिण) राधाबाई देशमुख,हे याच परिवारातिल होय. आदरणीय श्री.विजयसिंह उर्फ बाळासाहेब देशमुख (अंभोरकर) साहेब,परिवारात एक तेजस्वी रत्न उदयास आले.* *सामाजिक,राजकीय,धार्मिक,सेवेचे बाळकडू हे वडिल आदरणीय विजयसिंह उर्फ बाळासाहेब देशमुख अंभोरकर साहेबांकडून मिळाले. श्री.रणजितसिंह विजयसिंह देशमुख (दादा)यांचा आज वाढदिवस होय!..

त्यानिमित्ताने त्यांचे कार्याचा घेतलेला मागोवा.. त्यांचा जन्म 24 अक्टोंबर 1981 रोजी देशमुख अंभोरकर परिवारात झाला.इवलेसे रोपटे लावियेले द्वारी!त्याचा वेलू गेला गगनावरी!..या उक्ती प्रमाणे प्रथमापासूनच श्री.रणजितसिंह देशमुख हे स्वभावाने अतिशय विनम्र,शांत,संयमी,सुसंस्कृत सुस्वभाव,मनमिळावू ,कुशाग्र बुध्दि, ही त्यांची स्वभाव वैशिष्ठे होय.. त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन एक ग्रामीण भागातील नव तरूण उद्योजक बनून अंभोरे गावास बहुमान मिळवुन दिला.सर्व सामांन्य शेतकरी जनतेशी शेती निगडीत अशा व्यवसायाची निवड करुन शेतकरी यांना नेहमीच मदत करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असे .

गावातील थोरां मोठ्यांचा नेहमीच आदर बाळगून
गावातील विविध सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,राजकीय कार्यात सदैव अग्रेसर!अंभोरे येथिल विविध कार्यकारी सोसायटीचे बिनविरोध चेअरमनपदी 2006 रोजी संधी मिळाली आणी तेथूनच त्यांच्या राजकीय कार्याचा श्रीगणेशा सुरु झाला. मिळालेल्या संधीचे सोने केले.अंभोरे विविध कार्यकारी सोसायटीचे माध्यमातून सर्वसामान्य सभासद,शेतकरी यांचे हित साधत त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला.

अंभोरे गावचे सर्व धार्मिक मंदीर यांचा जिर्नोध्दार करुन सुंदर बनवीले त्यामूळे गावच्या विकासात मोठी भर पडली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून सभासद शेतकरी यांना शेतीसाठी पिक कर्ज उपलब्ध करुन शेतकरी यांचे आर्थीक स्तर उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.सोसायटीचे अंतर्गत स्वस्त धान्य दुकानाचे माध्यमातून सर्वांनाच अन्न धांन्याचा नियोजनपूर्वक वितरण करुन कोणीही यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. त्यांचा पारदर्शी कारभार,सुनियोजित नियोजन यामुळे सोसायटीची आर्थीक स्थिती भरभक्कम बनविण्यात यश संपादन केले . गावचे आज सर्व स्थानिक संस्था दादांचे मार्गदर्शनाखाली विकसित असुन झालेल्या विकासाने अंभोरे गावचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यांचे अचुक,योग्य मार्गदर्शनामुळे गावाचा कायापालट झाला आहे.विकास हेच ध्येय मनाशी बाळगून होत असलेला विकासाचा रथ चालवीत असतांना त्यांनी अंभोरे गावचे तरूण,युवक,जेष्ठ यांना बरोबर घेऊन यां सर्वांचा मेळ घालुन विकासाची घोडदौड सुरु केली आहे.

अंभोरे गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अधिक अधिक सुधारणा केली.मल्हारराव होळकर माध्यमिक आणी उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेजकडे अधिक लक्ष देवून गावातील पाणी,विज,रस्ते,शिक्षण,आरोग्य यासारख्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या.गावचे विकासासाठी मा.महसूल मंत्री,मा.आमदार बाळासाहेब थोरात यांचेकडे सतत पाठपुरावा करुन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध करुन मदत केली.मा.क्रिडा मंत्री मा.सुनीलजी केदार साहेब यांचे कडे पाठ पुरावा करुन लाखो रुपयाचे व्यायाम साहित्य मिळवून दिले.त्यांनी गावात केलेला विकासात्मक कार्याची पावती म्हणून संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते,आदर्श कुटूंब प्रमुख आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाचे संचालक म्हणून 2005 रोजी निवड केली.

स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात उर्फ दादा यांचा दुरदृष्टीकोण खुप मोठा होता.तालुक्यातिल सर्वसाधारण अल्प भुधारक शेतकरी याची असलेली कमी शेती हे बघुन अशा शेतक-यांचे जीवनात आर्थीक सुलभता यावी म्हणून शेतीपुरक व्यवसाय आणी त्यास जोड धंदा म्हणुन दुध धंदा निवड केली.आणी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी बँकेकडून आर्थसहाय्य मिळवून दिले. दुग्ध व्यवसाय सुरु करणेसाठी पुर्वी दुध संकलन केंद्र, दुध संघ नव्हता.त्यासाठी शेतकरी यांना दुध ग्रामीण भागात एखाद्य ठिकानी संकलन केंद्र असे तेही गावापासून दुर होते.तेथिल दुध अहमदनगर येथे शासकीय डेअरी मध्ये पाठविले जात.त्यावेळी तालुक्यातील पाच ते सहा गावे मिळुन एखादे दुध संकलन केंद्र असायचे अशा वेळी शेतकरी,महिला यांना गायीचे दुध घेऊन जाण्यासाठी पहाटे 4 वा.पाच-सहा किलो मिटरचे अंतरावरिल खेडे गावातिल दुध संकलन केंद्रा वर दुध घेऊन तिथे जावुन टाकावे लागत असे.त्यामूळे शेतकरी,महिला यांची होणारी कुचंबना यांचा विचार करुन स्वर्गीय दादांनी 1978 रोजी संगमनेर तालुक्यातील शेतकरी यांचे आर्थीक जिवनात समृध्दी आणण्यासाठी सहकारी तत्वावरिल संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ या संस्थेची स्थापना केली .

गावोगावी सहकारी दुध सोसायटीची स्थापना केल्या.आणि त्या संस्थेचे माध्यमातून दुध संकलित करुन दुध संघात आणुन दुध पिशवी,दुग्ध जन्यपदार्थाची निर्मिती केली आणी बाजार पेठेत विक्री सुरु केली. जिल्हाबँकेचे चेअरमन पदी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची वर्णी लागताच शेतकरी यांचे हित लक्षात घेता तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी यांना अल्प व्याज दरात गायींचे कर्ज प्रकरणे मंजूर केले आणी तालुक्यातील अनेक शेतक-यांना गायी मिळवून दिल्या.शेतकरी यांनी गायी खरेदी करुन दुध धंदा सुरु केला. त्यातून मिळ्णा-या पैशामुळे आर्थीक नियोजन शेतकरी यांना करता आले.तालुक्यातील शेतकरी यांचे कुटुंबाला आर्थीक मदतीचा हाथ दिला.ग्रामीण भागात गावोगावी स्थापन केलेल्या दुध संस्था,सोसायटी यांचे मार्फत संकलित दुध गोळा करुन ते दुध संघात आणले जात. आणी त्यातून मिळ्णा-या पैशातून शेतकरी आर्थीक स्वावलंबी झाला. सर्वसामान्य शेतकरी यांचे जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करुन ग्रामीण सर्वसामान्य शेतकरी यांचा आर्थीक स्तर नेहमी उंचावण्याचा प्रयत्न केला.स्वर्गीय दादांचे विचार आत्मसात करुन तालुक्याचे भाग्य विधाते मा.महसूल मंत्री,मा.आमदार श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघात मा.श्री.रणजितसिंह देशमुख उर्फ दादा यांनी दुध उत्पादक शेतकरी यांचे असलेल्या समस्या,प्रश्न,यांचा विचार करुन तालुक्यातील सर्वसामांन्य शेतकरी यांना जास्तीत जास्त गायींचे दुध वाढीसाठी प्रयत्न करुन आवश्यक असणारा पोषक असा गायीसांठी चारा,मका,मुरघास,प्रोटीन युक्त* *खाद्य निर्मिती करुन शेतकरी यांना उपलब्ध करुन दिले.दुध संघातही कर्मचारी,अधिकारी,दुध उत्पादक शेतकरी यांचा विचार करुन त्यांचे हित लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊन संघाची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे.

संकलित केलेल्या दुधावर प्रक्रिया करुन स्वच्छ शुध्द दुध पिशवी,तुप श्रीखंड,लस्सी,ताक,सुगंधी दुध ,पनीर ,बर्फी , पेढा ,सोनपापडी,दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करुन राज्यातील बाजार पेठेत राजहंस ब्रँड नावाने संगमनेरची एक नविन ओळख राज्यात निर्माण केली.महाराष्ट्र राज्यात संगमनेर तालुक्यातील दुध संघ हा नावाजलेला उत्कृष्ठ गुणवत्तापुर्ण संघ असुन आज प्रगतीपथावर आहे.ग्रामीण भागातील दुध उत्पादक शेतकरी यांचे आर्थीक परिस्थितीचा विचार करुन त्यांना किफायतशिर आर्थीक दृष्ट्या परवडेलअसा गायीसाठी मुक्त संचार गोठा ही संकल्पना यशस्वी पणे राबविली.मुक्त संचार गोठ्यामुळे गायींना मुक्त संचार करता येतो त्यामूळे सुंदर सुर्यप्रकाश मिळ्तो गायी मुक्त संचार करत असल्याने गायींची शारिरीक परिस्थिती निरोगी राहुन गायींच्या पायाची नखे खराब होत नाही निर्जंतुंकीकरण, निकोप राहतात.तसेच महिलांचा गायींचे गोठ्यात पडलेले शेण ,मुलमुत्र गोळा करणे अथवा उचलणे हा त्रास कमी होउन श्रमाची, वेळेची बचत होते.तसेच दुधात वाढ होते.तालुक्यातील अनेक गावोगावी तरूण युवकांना नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय करुन स्वावलंबी व्हावे असे आवाहन करुन अनेक तरूण,युवकांनी गायी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु केले त्यामूळे तिन लाख लिटर्स दूधावरुन आज संघात 4 लाख 50,000 लिटर्स दूधात वाढ झालेली असुन दुध वाढीचा आलेख हा नेहमी वाढत आहे.

गावोगावी तरुण युवकांचे संगमनेर प्रतिष्ठान,शिवराज्य निर्माण संघटना,अश्वप्रेमी संघटना,रणजित दादा देशमुख मित्र मंडळाचे माध्यमातून अनेक नव युवक तरुणांचे संघटन करुन मा.महसूल मंत्री,मा.आमदार बाळासाहेब थोरात यांचे पाठीशी एक भर भक्कम अशी तरुण युवकांची फौज निर्माण केली.मा.थोरात साहेबांनी दुध संघात करत असलेले अभ्यासपुर्ण काम आणी संघाची होत असलेली प्रगती बघुन श्री.रणजितसिंह देशमुख साहेबांना बढती म्हणून चेअरमन पदाची 2015 रोजी संघाचे चेअरमनपदी निवड केली.ते आजपर्यंत चेअरमन म्हणुन कार्यरत आहे.मा.महसूल मंत्री,मा.आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली दुध संघाला अनेक पुरस्कार मिळवून दिले. राज्यात सहकारी दुध संघाचा महासंघ ( महानंदा) या शिखर संस्थेच्या महानंदा संस्थेचे राज्यमंत्री दर्जा असलेले संस्थेवर चेअरमनपदी संधी मिळाली तिथेही अभ्यास पुर्ण मांडणी करुन दुग्ध उत्पादनास येणा-या समस्या,दुधाचे दराबाबतच्या अडचणी,याचा शासन दरबारी पाठपुरावा करुन त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला अतिशय कमी वयातील हुशार,कुशाग्र बुद्धिचा वापर करणारा पहिला अध्यक्ष म्हणुन एक बहुमान मिळविला.महानंदा या शिखर संस्थेचे चेअरमन पदी आज पर्यंतच्या इतिहासात फक्त मंत्री, खासदार, माजी.मंत्री, आमदार, माजी.आमदार हेच असायचे हा पायंडा मोडीत अतिशय कमी वयाचा कोणताही अनुभव पाठीशी नसतांना सन्माननीय रणजित सिंह देशमुख यांनी उत्कृष्ठ पणे कार्यभार यशस्वीपणे सांभाळला त्यांचे महानंदा मुंबई येथिल अधिकारी,कर्मचारी यांनी कौतुक केले.

नुकताच संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघास नव भारत उद्योग समुहाचे वतीने राज्यात असलेल्या सहकारी दुध संघापैकी उत्कृष्ठ संघ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असे अनेक पुरस्कार श्री.रणजितसिंह देशमुख साहेबांनी मिळवून दिले.त्यामूळे संगमनेर तालुक्याच्या विकासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला ही आपणा सर्वांसाठी आणी संगमनेर तालुक्याच्या दृष्टीने भुषणावह आणी अभिमानाची गोष्ट आहे.त्यांचे या यशस्वी कार्याला माझा मनापासून सलाम!..

त्यांच्या मनातील राजकीय इच्छा,आकांक्षा पुर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.अशा व्यक्तीमत्वाब्द्द्ल मी असे म्हणेल की,साहेब,झेप अशी घ्या की,पाहणा-याच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की,पक्षांनाही प्रश्न पडावा,इतकी प्रगती करा की,काळ ही पहात राहवा,कर्तुत्वाच्या अग्नी बानाणे ध्येय्याचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा हिच सदिच्छा. अशा या कर्तबगार ,कर्तुत्वान नेतृत्वास वाढदिवसाचे आणी विजयादश्मिचे निमित्ताने मन:पूर्वक अनंत शुभेच्छा!त्यांना उत्तम निरोगी आरोग्य आणी उदंड दिर्घ अयुष्य लाभो ही प्रार्थना !

