नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे नेतृत्व हरपले – आमदार थोरात

बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असा राजकीय प्रवास असणारे संघर्षशील नेतृत्व असलेले बबनराव ढाकणे यांनी कायम नव्या पिढीला मार्गदर्शन केले.
माझा आणि त्यांचा कायम स्नेह राहिला. 1985 मध्ये मी सर्वात तरुण आमदार म्हणून विधानसभेत असताना ते ज्येष्ठ आमदार म्हणून विधानसभेत होते यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन ते मार्गदर्शन करत. सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम काम करणाऱ्या स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी शेवटपर्यंत ग्रामीण भागातील गोरगरिबांची नाळ जुळवून ठेवली त्यांच्या निधनाने नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले असल्याची भावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड – आमदार तांबे

राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! संघर्षशील नेता अशी ओळख असलेले नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. अहमदनगर जिल्हा समृद्ध करण्यामध्ये मागील पिढीचा मोठे योगदान राहिले असून या पिढीतील एक संघर्ष नेतृत्व हरपले असल्याची भावना नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.

समाजासाठी झटणारा नेता हरपला – माजी आमदार डॉ तांबे

ग्रामीण भागातून विधानसभा लोकसभा असा प्रवास करताना केंद्रामध्ये ऊर्जा राज्यमंत्रीपद सांभाळताना सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर समाजाच्या विकासासाठी झटणारा नेता हरपले असल्याची भावना जय हिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *