संगमनेर । झुंजार न्यूज

ऑनलाईन कामे देवू नये , दिवाळी बोनस दया , शासनाकडून किमान वेतन दया आदी मागणीसह आशा वर्कर , गट प्रवर्तकांनी गेल्या १० दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु केले असून अदयाप शासनाचा कुठलाही निर्णय होत नसल्याने संगमनेर – अकोले तालुक्यातील हजारो आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या माध्यमातून संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले
या मोर्चाचे नेतृत्व अॅड कॉ सुधीर टोकेकर , कॉ सुरेश पानसरे , कॉ कारभारी उगले , कॉ सुभाष लांडे , कॉ निवृत्ती दातीर  यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णा शिंदे – थोरात , उषा अंडागळे , शोभा गायकवाड , रुपाली सोनवणे , मीना बिडगर , उषा दिघे , उज्वला काशिद , कुसुम गाडेकर , तस्लीम पठाण , नवसीन शेख , वाजीदा शेख , प्रणाली रुपवते आषपा शेख , सुजाता वाघमारे आदीसह संगमनेर – अकोले तालुक्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठया संख्येने सहभागी झाले होते .
ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आशा स्वयंसेविका, गत प्रवर्तक नित्य नेमाने सेवा बजावित आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील ७० हजार अशा स्वयंसेविका काम बंद आंदोलन करून गेल्या १० दिवसापासून बेमुदत संपावर असून अदयाप कुठलाही निर्णय शासना घेतला नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्टकांची ओळख आहे. घरोघरी भेटी देणे, आरोग्य तपासणी, माता बाळांची काळजी घेणे यासह जवळपास ७२ प्रकारची कामे आशांना करावी लागतात. ग्रामीण भागातील नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांची मात्र सरकार काळजी कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशा, गट प्रवर्तक यांना वेतनातील अर्धे वेतन फक्त गाठी,भेटी वर खर्च करावा लागतो. त्यांना दिलेल्या ॲपवर इंग्रजी भाषा असल्याने माहिती नमूद करताना अडचणी येतात.

शासन सेवेत असल्याने वेतन श्रेणी, वार्षिक वेतनवाढ बोनस गट प्रवर्तक महिलांना देण्यात यावे, आशा यांना ऑनलाईन कामे देऊ नये, दिवाळी पूर्वी बोनस द्यावे, केंद्राने मोबदल्यात वाढ करावी, किमान वेतन लागू करावे, यासह इतर मागण्यासाठी आशा, गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये संगमनेर – अकोले तालुक्यासह राज्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज लोकांमधून व्यक्त केला जात आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *