संगमनेर । झुंजार न्यूज 

 शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील राजकिय दृष्टया महत्वाच्या समजल्या जाणार्‍या आश्वी बु ॥ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीकरिता महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या कार्यकर्त्यानी  समोरा – समोर उमेदवारी अर्ज दाखल करत उभे राहील्याने अटीतटीच्या लढत होणार असतानाचं अपक्ष उमेदवारीमुळे आता सरपंच पदाची निवडणुक तिरंगी व रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले .
आश्वी बु ॥ करित  लोकनियुक्त सरपंच पद अनुसूचित जमातीच्या व्यक्तीसाठी राखीव असल्यामुळे विखे गटाकडून रविंद्र सुभाष बर्डे तर थोरात गटाकडून नामदेव किरण शिंदे याच्यांत थेट लढत दिसत असतानाचं तान्हाजी रघुनाथ नांगरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन रिंगणात उतवून सरपंच पदाची निवडणूक रंगतदार व अटीतटीची निर्माण केली .
ग्रामपचायत निवडणुक जाहिर होताचं दोन्ही गटाकडून सरपंच पदासाठी ६ तर सदंस्य पदाच्या १५ जागासाठी ८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारीच्या दिवशी कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतली . विखे – थोरात गटासह एक अपक्ष उमेदवारी अर्ज राह ल्याने तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले . यापुर्वी  ग्रामपंचायतीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात गटाची सत्तां होती. यावेळी महसूलमंत्री ना. विखे पाटील गटाने सत्तां आपल्याकडे खेचण्यासाठी पारखून एकास एक उमेदवार मैदानात उतरवल्याचे चित्र दिसले . 
लोकनियुक्त सरपंच पदासाठी रविंद्र सुभाष बर्डे (विखे गट), नामदेव किरण शिंदे (थोरात गट) व तान्हाजी रघुनाथ नांगरे (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.
प्रभाग १ :- चांद अहमद शेख (विखे गट), शितल दिलिप बोरुडे (विखे गट), राजश्री सोमनाथ गाडेकर (विखे गट) तसेच अजरुद्दीन सिकंदर शेख (थोरात गट), जयश्री विजय केदारी (थोरात गट), अरुणा विजय हिंगे (थोरात गट), याव्यतिरिक्त प्रशांत प्रकाश कोळपकर (अपक्ष) व रमेश मधुकर धर्माधिकारी (अपक्ष)
प्रभाग २ :- भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर (विखे गट), मिना आंतोन गायकवाड (विखे गट), सारिका विशाल पाटील (विखे गट) तसेच योगेश वसंत पिलगर (थोरात गट), सुरेखा दत्तात्रय पंडित (थोरात गट), रोहिणी राजकुमार जऱ्हाड (थोरात गट)
प्रभाग ३ :- अनिल राधाकिसन कगंणकर (विखे गट), विजय काशीनाथ म्हसे (विखे गट), बिजलाबाई भास्कर मोरे (विखे गट), तसेच अंकुश काशीनाथ घोडके (थोरात गट), बाळासाहेब नानासाहेब मदने (थोरात गट), कोमल शंकर माळी (थोरात गट)
प्रभाग ४ :- गोरक्षनाथ पांडुरंग म्हसे (विखे गट), सुभाष भिकाजी चतुरे (विखे गट), पुजा राहुल राखपसरे (विखे गट), तसेच अविनाश गिताराम गायकवाड (थोरात गट), बबन भाऊराव शिंदे (थोरात गट), पुजा किसन हतांगळे (थोरात गट)
प्रभाग ५ :- वैभव एकनाथ ताजणे (विखे गट), सायली प्रमोद ताजणे (विखे गट), मिना नवप्रकाश गायकवाड (विखे गट) तसेच अभिजित शंकर ताजणे (थोरात गट), दर्शना संतोष ताजणे (थोरात गट), परिघा बाळासाहेब गायकवाड (थोरात गट), याव्यतिरिक्त दिपक उत्तम गायकवाड हे अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत.
आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे ५ हजार ४०६ इतके मतदान असून या निवडणुकीत संरपचपदाकरिता ३ व  सदस्य पदासाठी ३३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवून आपले नशिब अजमावणार असल्याने प्रचाराकरिता १० दिवसचं उरल्याने कार्यकर्ते व उमेदवारांची दमछाक होणार आहे कुठल्याही क्षण वायाला न घालविता प्रचार होताना दिसणार आहे . 
चौकट
या निवडणुकीतून आरोप प्रत्यारोपाच्या होणार असले तरी या निवडणुकीत सत्ताधारी हे विकासाच्या मुद्दावर आपली बाजी मांडणार असल्याचे चित्र दिसत असले तरी अपक्षाची उमेदवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार ? हेऔत्सुक्याचे ठरणार आहे !
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *