संगमनेर । झुंजार न्यूज

 शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील राजकिय दृष्टया महत्वाच्या असणाऱ्या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी महसुलमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांचे गट समोरा – समोर उभे ठाकले असताना ‘ अपक्ष उमेदवारी राहिल्याने तिरंगी निवडणुकीत रंगत वाढल्याने आजी – माजी महसूल मंत्र्याच्या डावपेचाकडे तालुक्याचे नव्हे तर जिल्हयाचे याकडे लक्ष लागणार आहे .

आश्वी खुर्द करिता लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने विखे गटाकडून सौ. अलका बापूसाहेब गायकवाड तर थोरात गटाकडून सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे या रिंगणात उतरले तर सौ. सोनाली मोहित गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली ही निवडणूक रंगतदार व अटीतटीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

 विखे – थोरात या दोन्ही गटासह सरपंच पदासाठी १० उमेदवारी अर्ज तर सदंस्य पदाच्या ११ जागासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते माघारीच्या दिवशी  २५ ऑक्टोबरला कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले मात्र एक अपक्ष उमेदवारासह विखे – थोरात गटाचे एक – एक अर्ज राहील्याने तिरंगी निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले तर  अपक्ष उमेदवाराने आपल्या प्रचारा मुर्हुत ठरवून प्रचारास सुरुवात केली असल्याचे उमेदवारांकडून कळले 

लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ. अलका बापुसाहेब गायकवाड (विखे गट), सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे (थोरात गट) व सौ. सोनाली मोहित गायकवाड (अपक्ष) यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

प्रभाग १ :- सुवर्णा राजेंद्र सातपुते, (विखे गट), कल्पना सचिन क्षिरसागर (विखे गट) तसेच  रुपाली सुनील क्षिरसागर (थोरात गट), प्रतिक्षा मिलिंद जाधव(थोरात गट), 

प्रभाग २ :- सागर दिनकर भडकवाड (विखे गट), विठ्ठल बजाबा गायकवाड (विखे गट), गुलनाज कमाल सय्यद (विखे गट) तसेच भारत छब्बु भडकवाड (थोरात गट), इन्नुस छन्नुमियाॅ सय्यद (थोरात गट), नानुबाई तात्या माळी (थोरात गट). याव्यतिरिक्त मोहित गंगाधर गायकवाड (अपक्ष), संतोष भास्कर भडकवाड (अपक्ष) उमेदवारी करणार आहेत.

प्रभाग ३ :- जनाबाई देवराव शिंदे (विखे गट), सौ. आशा बंडु मुन्तोडे (विखे गट), दत्तात्रय सोन्याबापू मांढरे (विखे गट), तसेच संजय गबाजी भोसले (थोरात गट), पुनम राजेंद्र गायकवाड (थोरात गट), योगिता संजय शिरतार(थोरात गट), याव्यतिरिक्त लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर (अपक्ष) हे निवडणूक लढवणार आहेत.

प्रभाग ४ :- बाबासाहेब प्रताप भवर (विखे गट), सोपान मधुकर सोनवणे, (विखे गट), संगिता दत्तात्रय बर्डे (विखे गट), तसेच देवराम पांडुरंग गायकवाड (थोरात गट), संकेत गोकुळ गपले (थोरात गट), प्रमिला संतोष बर्डे (थोरात गट) याव्यतिरिक्त लक्ष्मण सदाशिव वाल्हेकर (अपक्ष) व सतिष निवृत्ती गायकवाड (अपक्ष) हे निवडणूक लढवणार आहेत.

आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे ३ हजार ३११ इतके मतदान असल्याने. या निवडणुकी मध्ये सदस्य पदासाठी २७ तर सरपंच पदासाठी ३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नशीब अजमवण्याकरिता  उतरल्याचे चित्र दिसत असल्याने ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतून दिसणार आहे . मात्र प्रचाराकरिता केवळ १० दिवस असल्याने कार्यकर्ते व उमेदवारांची दमछाक होणार असून पायाला भिंगरी लावून प्रचार करण्याबरोबरच आरोप प्रत्यारोप केले जाणार असल्याचे चित्र दिसत आहे . 
चौकट
प्रथमचं संरपच पदासह सदस्य पदाकरिता अपक्ष उमेदवारी दाखल झाल्याने विखे – थोरात या नेत्यासह  कार्यकर्त्याची डोकेदुखी होणार असून अपक्षामुळे कोणाचा फायदा या तोटा होता की अपक्षचं बाजी मारतो याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *