परत जा परत जा म्हणून घोषणाबाजी ; शांतता प्रिय मराठा समाज आक्रमक

संगमनेर । झुंजार न्यूज

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर साखळी उपोषण सुरू असून संगमनेर बस स्थानक परिसरात सत्ताधारी पक्षातील राधाकृष्ण विखे हे उपोषण स्थळास भेट देण्यात आले असता अत्यंत शांतता प्रिय असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी परत जा, परत जा विखे पाटील परत जा म्हणून घोषणा देत विखे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने केली आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे .या उपोषणाच्या समर्थनात संपूर्ण राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने अत्यंत शांततेच्या व सनदशीर मार्गाने साखळी उपोषण  सुरू आहे. विद्यमान सरकार विरुद्ध महाराष्ट्रात तीव्र असंतोष निर्माण झाला असून सर्व सत्ताधारी पुढार्‍यांना अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अशांतता असताना व संगमनेर मध्येही काही गावांमध्ये गाव बंदी असताना सत्ताधारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे फक्त राजकीय उद्देश ठेवून साखळी उपोषणास भेट देण्यास आले. खरे तर राज्यातील अनेक नेत्यांनी संघर्ष टाळण्यासाठी दौरे रद्द केले आहेत मात्र तरीही विखे राजकीय हेतू ठेवून आल्याने  तेथे उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी परत जा, परत जा विखे पाटील परत जा म्हणून घोषणाबाजी केली.

याप्रसंगी  पंकज पडवळ म्हणाले की, सत्ताधारी मंत्री उपोषणास पाठिंबा देण्यापेक्षा तुम्ही मुंबई येथे जा .तेथे जाऊन कायदा मंजूर करा .समर्थन देण्याचे नाटक करू नका असे सांगताना तीव्र शब्दांमध्ये सत्ताधारी पक्ष व विखे यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. तर दत्ता ढगे म्हणाले की, सत्ताधारी व त्यांचे समर्थक मराठा समाजाला फसू पाहत आहेत मात्र आता जनता शांत बसणार नाही.

तर वडगाव पान मध्ये पुढाऱ्यांना गाव बंदी असताना महसूल मंत्री विखे पाटील हे उद्घाटनासाठी आल्याने तेथील तरुणांनी ही त्यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

 

चौकट

गावच्या विकास कामांमध्ये कोणतेही योगदान नसताना श्रेय घेऊ नका – सौ.रुपाली थोरात

वडगाव पान मधील विविध विकास कामांकरिता काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला आहे .मात्र कोणताही संबंध नसताना फक्त राजकीय उद्देश ठेवून वडगाव पान मध्ये सत्ताधारी भाजपचे मंत्री हे उद्घाटनास आले आले आहेत .खरे तर गाव बंदी आहे. सर्वत्र अशांतता आहे. असे असतानाही जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचे काम सत्ताधारी मंत्री आणि त्यांचे समर्थक करत आहेत. यांना जनता कधीही माफ करणार नाही असा तीव्र शब्दात ग्रामपंचायत सदस्य सौ रुपाली थोरात यांनी निषेध व्यक्त केला आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *