संगमनेर । झुंजार न्यूज
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याचा सन 2023-24 या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. विधीमंडळ पक्षनेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते तर मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.

मा. कृषी व महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वाधिक भाव देणारा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखाना देशातील अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जात आहे. या कारखान्याने स्व.भाऊसाहेब थोरात यांची कडवी शिस्त, काटकसर,पारदर्शकता व उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या साखर कारखान्याने देशात आदर्श निर्माण केला आहे. हे वर्ष स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षानिमित्त अमृत उद्योग समूहात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दीपावलीनिमित्त कारखान्याच्या सभासदांना 15 किलो मोफत साखर वाटप कारखाना येथे सुरू आहे.

गुरुवारी होणाऱ्या या ऊस गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी आमदार सत्यजित दादा तांबे, बाजीराव पा खेमनर,ॲड माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजितभाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात, ,शंकर पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे, राजेश मालपाणी, संपतराव डोंगरे, विश्वासराव मुर्तडक, सुधाकर जोशी,रामहरी कातोरे,हौशीराम सोनवणे,राजेंद्र गुंजाळ, सनंदाताई जोर्वेकर,अजय फटांगरे,मिलींद कानवडे, नवनाथ आरगडे, के.के. थोरात,राजेंद्र कडलग,ॲड.सुहास आहेर, ,सौ अर्चनाताई बालोडे, सौ.प्रमिलाताई अभंग,सोमेश्वर दिवटे,सुभाष सांगळे,प्रा बाबा खरात,निखील पापडेजा,गौरव डोंगरे,निलेश थोरात,जावेद तांबोळी,आनंद वर्पे,संजय कोल्हे, हैदर अली,जीवन पंचारीया,जावेद शेख,जयराम ढेरंगे, सौ निर्मलाताई राऊत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

