अमृत उद्योग संघाच्या वतीने स्व. इंदिराजी गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
संगमनेर । झुंजार न्यूज
बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यांसारखे अनेक निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व धाडसी व पराक्रमी होते. देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी त्यांनी बलिदान दिले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण करणा-या भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे नेतृत्व हे देशाचे सर्वात कणखर नेतृत्व होते असे गौरवउद्गार पुरोगामी विचारवंत प्राचार्य हिरालाल पगडाल यांनी काढले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील शक्तिस्थळावर अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्वर्गीय इंदिराची गांधी यांच्या 39 व्या स्मृतिदिनानिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर व्हा. चेअरमन संतोष हासे ,लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, सुधाकर जोशी, आर बी राहणे ,सुभाष सांगळे, विष्णुपंत रहाटळ, रावसाहेब डूबे, के के थोरात, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, विलास वरपे, रामदास पा वाघ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, अनिल काळे, सौ मंदाताई वाघ, मीराताई वरपे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रा हिरालाल पगडाल म्हणाले की, दुसऱ्या महायुद्धानंतर देशाचा नकाशा बदलविण्याचे काम पहिल्यांदा आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी केले आहे. अत्यंत पराक्रमी व धाडसी असल्या इंदिराजींनी संस्थाने खालसा करून बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, अणुबॉम्बच्या निर्मितीसह अनेक उपग्रह अवकाशात सोडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी भारताचा दबदबा निर्माण केला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सहवास व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे संस्कार लाभलेल्या इंदिराची गांधी यांनी देशाच्या एकात्मतेमध्ये कधीही तडजोड केली नाही.
देशाची अखंडता टिकवण्याबरोबरच स्त्रियांच्या रक्षणाकरता त्यांनी सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्य पाठविले.
यातून खलिस्तानवाद्यांच्या रोशातून त्यांना स्वतःचा प्राण गमवावा लागला.
गरीबी हटावचा नारा देऊन समाजातील दिनदलित, गोरगरिबांची आई बनलेल्या इंदिराजींच्या नेतृत्वाने देशाला प्रगतीवर नेले.
आज मात्र देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. मनभेद निर्माण करून जाती जातींमध्ये भांडले लावली जात आहे. ज्या ज्या वेळी बिगर काँग्रेसची सरकार सत्तेवर आले त्यावेळी दहशतवादी संघटनांनी आपले डोके वर काढले आहे. महिलांच्या असुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मणिपूर जळते आहे. म्हणून हा देश एकसंघ ठेवण्यासाठी आगामी काळात सर्वांनी इंदिराजींचे विचार घेऊन काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
तर बाबा ओहोळ म्हणाले की , सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नव्या पिढीला इंदिराजींच्या कार्यातून प्रेरणा मिळावी याकरता कारखाना कार्यस्थळावर शक्तिस्थळ निर्माण केले आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असते. आज देश कठीण परिस्थितीमध्ये असून अशावेळी कणखर नेतृत्व असलेल्या इंदिराजींच्या विचारांची गरज आहे.. काँग्रेस पक्षाने कायम राष्ट्रहिताचेच काम केले असून कधीही धार्मिक वाद होऊ दिला नाही .मात्र सध्या धार्मिकतेच्या नावावर सुरू असलेले राजकारण अत्यंत दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले. यावेळी ॲड.अशोक हजारे, अजित काकडे, प्रा बाबा खरात, सोमनाथ गोडसे, संभाजी वाकचौरे, प्रा विवेक धुमाळ, बापूसाहेब गिरी ,राजेंद्र कडलग , डॉ सुजित खिलारी, अंबादास वाणी, आचार्य बाबुराव गवांदे, दत्तात्रय चासकर ,डॉ व्यंकटेश, कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे, भास्करराव पानसरे आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले

