संगमनेर । झुंजार न्यूज
राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरु केला आहे. संविधानातील कलम ३४० नुसार आरक्षण देणे शक्य असतानाही केंद्र सरकार सूची तयार करीत नाहीत. मराठा बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार सरकार करत आहे, असा सवाल करीत संध्या शिर्डी लोकसभा मतदार संघातंर्गत असणार्या मराठा आरक्षणाकरिता होत असलेल्या साखळी उपोषणाला रिपाई ( आठवले ) चा पाठिंबा जाहिर करत प्रत्येक तालुक्यातील होत असलेल्या मराठ्यांच्या साखळी उपोषणात रिपाई कार्यकर्त्यानी सहभागी व्हावे असे आवाहन रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्रारे केले आहे .
विजयराव वाकचौरे यांनी प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणाले की , मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण हा गावो गावी , तालुक्यात उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे हे सुद्धा सहा दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. आता, मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानाच्या कलम ३४० मध्ये असे स्पष्ट नमूद केले आहे की, जातगणना करुन एका समूहाला आरक्षण देणे शक्य आहे . याचं धरर्तीवर केद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ही वेळोवेळी मराठा आरक्षणाकरिता पाठिंबा दिलेला असून मराठा समाज्याला आरक्षणाची खरोखर गरज असून त्यांना आरक्षण मिळावे . अशी आमची धारणा आहे .
वाकचौरे पुढे म्हणाले की , भारतीय संविधानाच्या कलम ३४० चा आधार घेऊन आयोगाची निर्मिती करावी, हा आयोग राष्ट्रपतींना आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर राष्ट्रपती आदेश देऊन आरक्षणाचा प्रस्ताव संसदेच्या दोन्ही पटलांवर मांडण्याची सूचना करतील. त्यासाठी ओबीसी, एससी, एसटी या प्रमाणे नवीन सूची निर्माण करुन कोणच्याही आरक्षणला धक्का न लावता आरक्षण देता येईल. जर गुजरातमध्ये पटेल समाज्याला आरक्षण दिले जात असेल तर महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले जात नाही? हे संसदेत बसलेले मराठा खासदार हे मोदींच्या भीतीमुळे त्या विरोधात बोलायला तयार नाहीत. त्यामुळेच आता राज्यातील २८८ आमदारांनी पंतप्रधानां आरक्षणाची बाजू मांडवावी व आपल्या मराठा बांधवांना टिकणारे आरक्षण मिळवून दयावे .
आता गावो गावी बंदची हाक , साखळी उपोषण होत असल्याने आज तरुण खरोखर जागृत झाल्यानेचं हे चित्र दिसू लागले आहे . मराठा समाज्याला आरक्षण मिळावे हीचं रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची इच्छा असून कार्यकर्त्यानी जेथे – जेथे उपोषण होत असेल तेथे – तेथे सहभागी व्हावे असे आवाहन विजयराव वाकचौरे यांनी शेवटी केले आहे .
