संगमनेर । झुंजार न्यूज

 

 संगमनेर शहरांमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भातील साखळी उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला.

 

मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने त्वरित आरक्षण द्यावे. तसेच जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाचा सरकारने गांभीर्याने विचार करून आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आरक्षण देत असताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू न देता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण जाहीर करावे व मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांची मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते केद्रींय मंत्री ना रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने व जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या आदेशाने मराठा समाजाच्या या आंदोलनात पूर्ण ताकतीने उभा राहणार आहे अशी भूमिका संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके व शहराध्यक्ष कैलास कासार यांनी मांडली

 

यावेळेस विजय खरात, योगेश मुंन्तोडे , गौतम वर्पे, रुपेश राऊत, रुपाली सोनावणे, भरत भोसले, राहुल गागरे, शानू बेगमपुरे, असिफ शेख, सिदार्थ खरात, प्रमोद खेमणर,रोहिदास उंडे,दिनकर खरात आदी उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *