संगमनेर । झुंजार न्यूज 

 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संपूर्ण महाराष्ट्राभर आमरण उपोषणाला सकल समाज बांधव प्रतिसाद देत आहे. घुलेवाडी येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नाशिक पुणे हायवे घुलेवाडी फाटा येथे प्रविण कानवडे ,जालिंदर राऊत,संदिप राऊत, बाळासाहेब ढमाले यांनी आमरण उपोषण 1नोव्हेंबर2023 पासून सकाळी सुरू करण्यात आले आहे.

 

आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांचा सोबत आरपारची लढाई करत उपोषण करायचे जीव गेला तरी चालेल पण मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने कुणबी म्हणून ओबीसीतुन मराठा आरक्षण त्वरित दयावे ,मराठा समाजातील आत्महत्यांचे लोण आता नगर जिल्ह्यात पोहचले असुन सरकारने आता गंभीरपणे विचार करावा. जय जिजाऊ जय शिवरांयाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,एक मराठा लाख मराठा,कोणं म्हणतं देत न्हाय घेतल्या शिवाय राहातं न्हाय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या

 

या आंदोलनात सीताराम राऊत, डॉ सचिन राऊत सतीश ढमाले सर बाळासाहेब राऊत, राहुल राऊत,शरद पानसरे,किरण ढमाले, कैलास काशीद,गोरख राऊत, गोरख शिंदे, रवी गिरी सुरेश ढमाले अनिल राऊत चंद्रकांत शिरसागर किरण ढमाले सुनील घोटेकर नितीन काशीद विजय गुंजाळ सुनील राऊत, दिनकर घुले, पोपट भारसकळ समाज बांधवांनी पाठिंबा दिला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *