संगमनेर । झुंजार न्यूज

नुकत्याचं झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीनंतर सत्ता न मिळलेल्या विरोधाकांनी षडयंत्र रचत सामाजिक काम करणाऱ्या विजय हिंगे यांच्या घरामागील ऊसात बांधकाम कामगार योजनेतील पेट्या टाकून खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या जागृत व एकीमुळे तलाठ्यासह तपासणी करणारे आधिकारी तत् मम् करत बसले , यामागील सुत्रधार १५ दिवसात शोधा अन्यथा पोलिस स्टेशन समोर सर्व ग्रामस्थ अमरण उपोषण करणार असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिला .
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ॥ येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वीय साहाय्यक विजय हिंगे यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीत विजयी झाल्याने जिव्हारी लागलेल्या विरोधाकांनी षडयंत्र रचत हिंगे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्याने सर्व ग्रामस्थ एकत्र येत दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी निषेध सभा घेण्यात आली . या निषेध सभेतून आश्वी व परिसरातून आलेल्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .   

यावेळी रिपाईचे जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते विजय हिंगे , कॉग्रेस शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले , माजी संरपच महेश गायकवाड , उपसंरपच राहुल ज-हाड , रिपाई (गवई )  जिल्हाध्यक्ष किशोर वाघमारे , विजय शेळके , संतोष ताजणे , गणेश गायकवाड , बाळासाहेब बिहाणी , नवनाथ आंधळे , डॉ संजय सांगळे , संतोष नागरे , संजय कोल्हे , गायकवाड , भाऊसाहेब खेमनर , अनिल भुसाळ , अमोल त्रिभुवन , दिलावर शेख , शिबलापूर संरपच प्रमोद बोंद्रे , जालिंदर बोंद्रे आदीसह  हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी बाळासाहेब गायकवाड पुढे म्हणाले की , गलिच्छ राजकारण करुन प्रामाणिकपणे सामाजिक कामा करणाऱ्या तरुणावर खोटे आरोप करणे म्हणजे आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन करु नका ग्रामपचायती मधून काय मिळते ? राजकारणात हार – जीत चालू रहाते ज्याला हार पचवंत नाही त्यांनी गलिच्छ राजकारणातून खोटे नाटे प्रयोग करु नये हवे असेल तर नूतन संरपचासह ही नविन इमारत सुद्धा तुम्हाला घ्या मात्र प्रामाणिक माणसाला बदनाम करु नका ! 
आधिकाऱ्यांच्या माध्यमातून हिंगे यांच्या घराभोवती जे षडयंत्र रचन्यात आले ते राजकिय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना आहे . वयोवृद्ध महिलेला जाणून – बुजुन त्रास देण्यात आल्याने ग्रामस्थ सुद्धा आज एकत्र आले . 
यावेळी विजय हिंगे म्हणाले की , आजपर्यत मी प्रामाणिक काम केले गोरगरिबांचा पैसा खाऊन मी मोठा होणार नाही . लोकांचा विश्वास व दिशा असल्याने माझ्या हातात पुन्हा ग्रामपचायत दिली . यातुन मी लोकांचा विश्वासघात करणार नाही मात्र मी केलेल्या प्रामाणिक कामाला छेद लावण्याकरिता या ना त्या मार्गाने प्रयोग होत आहे . आता लोकांनी ही ओळखले आहे .
यावेळी निषेध सभेतून सचिन चौगुले , किशोर वाघमारे , संतोष ताजणे , गणेश गायकवाड , राहुल ज-हाड , विजय शेळके , बाळासाहेब बिहाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .
चौकट 
१ ) बांधकाम कामगाराच्या पेट्या हिंगे यांच्या ऊसात टाकून खोटा गुन्हा दाखल करण्याच्या षडयंत्राविरोधात संपूर्ण गाव बंद ठेवत निषेध मोर्चा व सभा झाली .
२ ) निषेध सभा संपल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वी बु॥ बाजारतळावर आगमन होताचं संपूर्ण ग्रामस्थांनी त्याच्या समोर झालेल्या घटनेची कैफियत मांडल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांशी बोलून सखोल चौकशी करण्याचे सांगतो . म्हणत हा सर्वसामान्याविरोधात होणारा दहशत चांगला नाही त्यांचे झाकण निश्चितचं उघडते .
३ ) बांधकाम कामगारांचे संगमनेर मधून २०००० प्रकरण करण्यात आले यात हिंगे यांचा मोठा वाटा असल्याचे संजय कोल्हे यांनी सागितले तर गावातील व्यापार्‍यासह , शेतकरी , तरुणांनी एकत्र येत उस्फुर्तपणे निषेध व्यक्त करत गांव बंद ठेवण्यात आले 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *