आश्वी । झुंजार न्यूज
दोन्ही आश्वी ग्रामपचायत निवडणुका संपल्या . . . आता जिल्हा परिषद , पचायत समिती निवडणुकीचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्याची भावगर्दी सुरु झाली मात्र ग्रामपचायत निवडणुकामधून अपक्षाचा बोलाबाला दिसून आल्याने ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद , पचायत समितीची चाचपणी सुरु झाली आरक्षण कुठले निघू मात्र आपण प्रवाहात असल्याचे जाणिव करु देण्याची कार्यकर्त्याची धडपड सुरु असल्याचे चित्र दिसत असल्याने बहुतांश युवकांनी ‘ अपक्षांकरिता ‘ आपली कंबर कसल्याने विखे – थोराता पुढे पंच निर्माण होण्याचे चिन्हे दिसणार आहे .
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी जिल्हा परिषद गटात आरक्षणाचा विचार न करता कॉग्रेस कडून व भाजपा कडून अनेक इच्छुकांची जोरदार चर्चा होताना दिसत असून आश्वी खुर्दच्या ग्रामपचायत लोकनियुक्त संरपच पदाच्या लढतीतून जोरदारपणे लढत दिलेल्या अपक्षांची संध्या बोलबाला सुरु असल्याने जिल्हा परिषद , पचायत समितीच्या निवडणुकांकडे सर्वाचे लक्ष लागले असल्याची चर्चा होत आहे .
आश्वी जिल्हा परिषद गट हा प्रवरा ४० गाव प्ररिसरातील येत असल्याने बहुतांश वर्षापासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जात आहे . तर विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून व जुना ऋणानुबंधाने माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव परिसरावर आहे थोरात – विखे एकत्र असो अथवा नसो २०१९ पर्यत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले . मात्र मागील जिल्हा परिषद , पचायत समिती निवडणुकीत विखे – थोरात कॉग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेनी जोर्वे गटात तर थोरातानी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती दोन्ही ठिकाणी अपक्षाची दाळ शिजली नाही मात्र विरोधाची मात्र ठिणगी पडली . कुठलाही कार्यक्रम असो एकमेकावर टिका टिपणी दिसून येत आहे आता दोन्ही नेत्याची भूमिका वेगळी , पक्ष वेगळा असल्याने मिनी मंत्रालया सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्या पासून संपूर्ण जिल्हयात जोरदार प्रयत्न होणार यात तिळ मात्र शंका नाही .
आश्वी जिल्हा परिषद गट हा पाहीजेल तसा सोयिस्कर नसून विविध जाती – धर्माचे , सुशिक्षित व संधन लोक असून राजकारणा विषयी जाणकार असून हा बागयतदार भाग असताना सुद्धा विखे – थोराताच्या भोवती वलय दिसत आहे . सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करुन कार्यकर्त निर्माण केले दोन्ही विधानसभेच्या सिमेवरील ही गावे आहेत . विकासात्मक कामे चढा ओढीने होताना दिसत आहे मागील जिल्हा परिषद निवडणुकीत महीला राखीव आरक्षण होते यात विखे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाजी मारली . मात्र गेल्या ५ वर्षामध्ये त्या स्वकतृत्वाने पुढे दिसून आल्या नाही केवल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमातून चमकल्या .त्यामुळे या परिसरातील लोकांनाही जिल्हा परिषद , पचायत समिती सदस्य कोणी आहे याकडे दुर्लक्षीत झाले केवळ ‘ विखे एक विखे ‘ ! मोठी कामे असो या छोटी काम असो केवळ विखे पाटील यांच्या निर्णयाकडेचं लक्ष्य राहते .. आता कदाचित थोड्याचं दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनेकांची लपून राहिलेली इच्छा दिसून येणार आहे मात्र वरिष्ठाचा कोणावर आशिर्वाद पडेल सागता येत नाही मात्र मागील पंचवार्षिकला विखे – थोरातांनी सुरु केलेली अपक्ष चळवळ ही पुढे निश्चित दिसून येणार आहे .
तर संध्या विखे गटाकडून अॅड अनिल भोसले , भारत गीते , भगवानराव इलग , अॅड पोपट वाणी , तबाजी मुन्तोडे , प्रभाकर निघुते , मच्छिद्र थेटे , निवृत्ती सांगळे , तर थोरात गटाकडून विजयराव हिंगे , गणपतराव सांगळे , डॉ संजय सांगळे , राजेंद्र चकोर , माजी संरपच महेश गायकवाड याच्यासह तरुण उदयोजक मोहीत गायकवाड ( अपक्ष ) ,आशिष शेळके ( रिपाई ) , या इच्छुकांनी बांशिग बांधल्या असून आप आपल्या परिने यांनी फिडींग लावली मात्र परिसरात लोकांच्या होणाऱ्या चर्चतून तरुणांचा अपक्षाकडे जास्त कल दिसत असल्याने थोरात व विखे गटाला मोठी डोके दुःखी ठरणार आहे .त्यामुळे या निवडणुकाकडे जिल्हयाचे लक्ष्य वेधले जाणार हे मात्र निश्चितचं !
पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वी बु॥ मध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विजय हिंगे यांनी लोकामध्ये जावून विकासात्मक कामाना प्राधान्य दिलेयशोधन कार्यालयातून येणाऱ्या प्रत्येक माणसांच्या समस्या , प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर आश्वी बु ॥ सारख्या मोठ्या गावामध्ये ग्रामपचायतीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक काम करुन घेतली तर जिल्हयात कोठेचं नाही असे राम मंदिर बनविण्याचे लोकांचे स्वप्न साकार केले व लोकांना आपलेसे करत छोट्या मोठ्या समस्या स्वकतृत्वाने सोडवि ल्यानेचं सिमीफाईनल म्हणून नुकत्याचं झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीत पुन्हा एकदा सत्ता मिळविली . तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अति विश्वासातील आश्वी खुर्द हे गाव असून अनेक निष्टवान व विश्वासू तरबेज युवकासह कार्यकर्त्याची मोठी फळी आहे . तरी ही नुकत्याचं झालेल्या ग्रामपचायत निवडणुका मधून अपक्षानी मिळविलेली मते ही भविष्यात होणाऱ्या निवडणुकामध्ये दमछाक करु शकतात त्यामुळे प्रतापपूर , शिबलापूर , पिंप्री लौकी अजमपूर , शेडगांव , उंबरी आदी गांवातील ही कार्यकर्त्याना उमेदवारी मिळू शकते .
चौकट
आश्वी गटातील होणाऱ्या जि प , प स च्या निवडणुक ही दोन्ही आश्वी केंद्रबिंदू असणार थोरात – विखे गटाकडून दोन्ही आश्वीमधून उमेदवारी झाल्यास अपक्षांना खिळ बसणार मात्र आश्वी व्यतिरिक्त उमेदवारी झाल्यास अपक्षाचा बोलाबाला हा मोठ्या प्रमाणात दिसणार त्यामुळे लढत ही मात्र रंगदारचं होवून ही लढत खऱ्या अर्थाने विखे – थोरात यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे आरक्षणाची सोडत काय निघेल याकडे लक्ष्य !
Post Views: 774
