शिर्डी । झुंजार न्यूज

राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून  २०० लोकांच्या जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केल्याने ही निंदणीय व मानवी समाज्याला काळीमा फासणारी घटना असून पोलिस प्रशासनाने हल्ला केलेल्या या गांवगुंड आरोपीना त्वरीत ताब्यांत घेवून कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे ( आठवले ) राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली  आहे .

 प्रसिद्धी पत्रकात वाकचौरे पुढे म्हणाले की , निर्मळ पिंप्री हे गांव नगर – मनमाड या राष्ट्रीय महामार्ग व शिर्डी साई बाबाच्या पावन भूमी जवळ असून राजकिय सुडाच्या भावनेतून निर्मळ पिंप्री या गांवात काही ठराविक गांवगुंडाच्या हेकेखोरामुळे समाज्या – समाज्यात तेढ निर्माण करण्याचे काम होताना दिसत आहे . केवळ निवडणुकीचा राग धरुन दोन कुटुंबावर हल्ला होणे म्हणजे मानवी समाज्याला काळीमा फासणारी व निंदणीय घटना असून राज्याचे महसुल मंत्र्यांच्या मतदार संघातील ही घटना आहे .

नुकत्याचं झालेल्या निवडणुकीचा राग मनात ठेवून ग्रामसंभेच्या माध्यमातून गावात समाज्या – समाज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत दोन कुटुंबावर हल्ला चढविला  जर पोलीस आणि काही नागरिकांनी हस्तक्षेप केला नसता तर हे कुटूंब आज कुठल्या आवस्थेत असते हे कल्पना न करणारी घटना आहे . चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने जीवघेणा हल्ला केलेल्या  गांवगुंडांना त्वरीत शासन झाले पाहिजेल तर राजकिय सूडातून झालेल्या प्रकाराला समाज माफ करणार नाही असे वाकचौरे म्हणाले.

चौकट

दोन दिवसांपूर्वी एका हॉटेलवर वाद झाला होता पण तो वाद सामोपचाराने मिटवण्यात आलं होता, मात्र एका ग्रामपंचायत सदस्याला अर्वाच्च शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर वाद पुन्हा उफाळून आला. यानंतर जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. सुदैवाने काही पोलीस घटनास्थळी होते त्यांनी रक्षण केल्याने कुटुंबियांचा जीव वाचला आहे या कुटुंबाला या गांवगुंडाकडून धोका असल्याने पोलिसांनी यांच्या त्वरीत बदोबस्त करुन या गांवगुंडावर त्वरीत कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून 

विजयराव वाकचौरे ( राज्य उपाध्यक्ष रिपाई A ) 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *