कोपरगांव । झुंजार न्यूज

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल संवत्सर मध्ये विज्ञान प्रदर्शन आणि अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती सदस्य मधुकर साबळे होते.तर प्रमुख अतिथी एस.एस.जी.एम. कॉलेज कोपरगाव येथील रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ मोहनराव सांगळे,अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी उपाध्यक्ष गजानन शेटे होते. विद्यार्थ्यांनी खास करून बनवलेल्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू हे विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
               
या प्रदर्शनात एकूण 254 उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार केली होती. त्यामध्ये एकूण 526 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक रमेश मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भगवान शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे
माजी उपाध्यक्ष गजानन शेटे सर यांनी मनोगतात तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कसे आयोजित केले जाते. उपकरणांची निवड कशा पद्धतीने होते पुढे कशी पाठवली जातात याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. डॉ मोहन सांगळे यांनी यासारख्या प्रदर्शन प्रदर्शनांमधून विद्यार्थ्यांनी जिज्ञासा शक्ती वाढवावी व त्यातून भविष्यकाळातील शिक्षणाच्या संधी नेमकेपणाने शोधाव्या. विविध देशांत रसायनशास्त्र मधील केलेल्या कार्याचा त्यांनी उलगडा करत संशोधनात्मक पेपर कसे प्रसिद्ध होतात याविषयी माहिती दिली केला पेपर कसे पब्लिश होतात याविषयी माहिती दिली . त्यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख पुस्तकाच्या पाच प्रति घेण्यासाठी विद्यालयाला देणगी जाहीर केली. 
               
अध्यक्षपदावरून बोलताना मधुकर साबळे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुले विज्ञान गणित या विषयात मागे राहतात त्यासाठी शिक्षकांनी त्यांची सर्व तयारी करून घेत यातील नेमकेपणाच्या संधी कशा आहेत याची माहिती द्यावी. विद्यालयाचे पर्यवेक्षक शरद आंबिलवादे यांनी मानले.
सूत्रसंचालन श्री. जनार्दन खेताडे, सुनील वाघमारे यांनी केले.
       
याकार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य दिलीप बोरणारे स्थानिक सल्लागार समितीचे चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मण साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खंडेराव फेपाळे, पोलीस पाटील लीना आचारी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल भोसले, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *