अहमदनगर । झुंजार न्यूज

 

दूध दर व कांदा निर्यात बंदी या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा-विरुद्ध कोल्हार भगवतीपुर येथे शिवसेना(उ.बा.ठा) पक्षाच्यावतीने मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

आज दुधाला मिळणारा दर त्या तुलनेत चारा व खाद्याचे वाढलेले दर यात प्रचंड तफावत जाणवत आहे. दूध व्यवसाय संदर्भात शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे. दुधाची अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने कांद्यावरही निर्यात बंदी लावलेली आहे.

 

सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणा संदर्भात शिवसेनेचे मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वात दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी कोल्हार भगवतीपुर येथे भव्य आंदोलन छेडणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. दुधाला किमान ५० रुपये व कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी ही प्रमुख मागणी याद्वारे करण्यात आली.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *