संगमनेर । झुंजार न्यूज  

 

संगमनेर तालुक्यातील राजकिय दृष्टया महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या  कोकणगांव शिवापूर येथील आशाबाई हनुमंत जोंधळे यांचे गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपचायत घर पट्टी व पाणी पट्टी थकीत असल्याने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जोंधळे यांचे सरपंच पदासह सदस्य पदही रद्द केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाल्याने हा सगळीकडं चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर अनेक सरपंच सुध्दा जागृत झाले आहे.

 

 

सविस्तर माहिती अशी की , सरपंच आशाबाई जोंधळे याच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य संजना मच्छिंद्र पवार , दिलीप आण्णासाहेब जोंधळे , मंगल अनिल जोंधळे , वनिता घनशाम भोसले , अरुण जानकु जोंधळे , राधिका बाळासाहेब पवार ,  कैलास बन्सी पवार या सदस्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे संरपचाकडे ग्रामपंचायत थकबाकी असल्याची ग्रामपंचायत आधिनियम कलम 14 ह नुसार तक्रार दाखल केली होती त्या प्रकरणी सुनवणी घेण्यात आली दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्यानंतर सरपंच याच्याकडे दोन वर्षाची थकबाकी असल्याने निष्पन्न झाले त्यानुसार जोंधळे यांचे सदस्य पद रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *