संगमनेर । झुंजार न्यूज 

शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाच्या 35 विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली असून विद्यार्थ्यांना 3 लाखा पासून ते 7 लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली आहे.

 माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने आत्तापर्यत शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. गुणवत्ता यादीत अग्रेसर असणान्या अमृतवाहिनी एमबीए महाव्द्यिालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे आत्तापर्यंत महाव्द्यिालया मधून 2580 विद्यार्थ्यांनी एमबीए पदवी संपादन केलेली आहे. अशा या एमबीए महाविद्यालयाची स्थापना सहकारातील दूरदृष्टी नेतृत्व असलेले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून 1994-95 मध्ये झालेली आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये प्लेसमेंट झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे; (इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) 15, प्लेअर्स एनजी एलपीपी (औथ चैनल पार्टन व टाटा पॉवर ) 8 , बजाज कॅपिटल लि. (बजाज फायनान्स) 10,  पेटीएम 1, सोलर स्केअर एनर्जी प्रा.लि 1 यावरील सर्व 35 विद्यार्थ्यांची नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीसाठी निवड झालेली आहे.

     

महाविद्यालयाने दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार, कॉन्फरन्सचे आयोजन व नवीन उद्योजक घडविण्याचे कार्य केलेले आहे. अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कायम संलग्नित असून महाविद्यालयाने सर्व क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. तसेच महाविद्यालयाने आयएसओ मानांकन प्राप्त केलेले असून 2018-2019 मध्ये महाविद्यालयाने यूजीसी चे नॅक मानांकन मिळवलेले आहे. महाविद्यालयात पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शास्त्रातील पीएचडी संशोधन केंद्र कार्यरत असून त्यामध्ये 27 विध्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत महाविद्यालयांमध्ये आठ प्राध्यापक पीएचडी धारक असून पीएचडी चे मार्गदर्शक आहे अमृतवाहिनी एमबीएची ओळख पुणे विद्यापीठातील एक अग्रगण्य महाविद्यालय अशी आहे.

           

अमृतवाहिनी एमबीए महाविद्यालय निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेले असून महाविद्यालयात शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा आहेत त्यात स्वतंत्र इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, प्लेसमेंट कक्ष, संगणक कक्ष, होस्टेल व मेस सुविधा आणि ग्रीन कॅम्पस इत्यादी सुविधा नवीन प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा, नवीतम उपक्रम, विद्यार्थ्यांची प्लेसमेंट याबाबत राष्ट्रीय स्तरावरील एशिया टुडे रिसर्च अँड मीडिया या ग्रुप द्वारे दिला जाणारा व्यवस्थापन शास्त्रातील राष्ट्रीय पातळीवरील 2022 चा बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. नितीन एस. भांड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

       

यावर्षी कॅम्पस प्लेटमेंट द्वारे निवड झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे. विश्वस्त शरयू देशमुख, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राध्यापक व्ही. बी धुमाळ, शैक्षणिक संचालक डॉ. जे. बी. गुरव यांनी प्लेसमेंट झालेले विद्यार्थी व त्यासाठी प्रयत्न करणार्या अमृतवाहिनी एमबीएच्या सर्व स्टाफचे अभिनंदन केले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *