आश्वी । झुंजार न्यूज 

 

अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाचे शनिवारी आश्वी बुद्रुक मध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.

 

प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, पारंपरिक सनई,ढोल ताशाचा गजर,लेझीम, झांझरी या वाद्यांचा गजर आणि जय श्रीराम असा जयघोष करत शनिवारी सकाळी श्री प्रभु राम मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली.मिरवणुकी चा अग्रभागी सनई चौघडा ,लेझीम पथक, झांजरी पथक, मंगल कलश घेतलेल्या तरुणी ,सफेद वस्त्र व भगव्या टोप्या घातलेले ग्रामस्थ,भजनी मंडळ,महिला व तरुणी,पाठोपाठ फुलांनी सजवलेल्या पालखीत अक्षता कलश ,ढोलीबाजा, फुलांनी सजविलेल्या बैलगाडी रथात प्रभु श्रीराम, लक्ष्मण, सीता, हानुमान यांचा पोशाख परीधान केलेले बाल गोपाल सहभागी झालेले होते.अयोध्येहून आलेल्या अक्षदा व मंगल कलशाची विधिवत पूजा करत ग्रामस्थ आणि रामभक्तांतांनी पुष्पवृष्टी करत दर्शन घेत स्वागत केले.

 

हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातुन देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. चौकाचौकांत मंगल कलशांचे पूजन करण्यात आले. त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गावात सर्वत्र सडा रांगोळी काढण्यात आल्या होत्या श्रीराम मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा ,बाजारपेठ, सोनार गल्ली,हानुमान गल्ली,बाजारपेठेतुन बाजारतळावर येत प्रभू श्री राम मंदिरात समारोप झाला.

 

यावेळी २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक जाणार आसुन आश्वी बुद्रुक येथे हि मोठ्याप्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले.याप्रसंगी श्रीरामभक्त मंडळानी अतिशय सुंदर नियोजन केले होते तर आश्वी पोलिस स्टेशन चा वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शोभायात्रेचा समाहारोप हनुमान चालिसा म्हणून व महाआरती करुन करण्यात आला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed