आश्वी । झुंजार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र वरवंडी मध्ये सुरु असलेल्या बह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज पंधरावा फिरता नारळी सप्ताहाच्या सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण समाप्तीनंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची व ह भ प दत्तगिरी महाराज यांची संपूर्ण गांवातून भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली होती . 
सप्ताहा स्थळापासून ते गांव , गांवापासून ते माणिकगिरी महाराज समाधी स्थळी त्या नंतर सप्ताहा स्थळी भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली . यावेळी महीला व पुरुषांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला भक्तगणांनी टाळ – मृदंगाच्या व टाळ्याच्या साहाय्याने भजनांचा गजर देत भक्तीमय वातावरण निर्मित होता दिसले तर महीला – पुरुषांनी मोठ्या उत्साहात फुगड्या खेळ – खेळत ठेका धरल्याचे दिसून आले .
सप्ताहाच्या आदल्या दिवशी एकादशी असल्याने सकाळ पासून ते संध्याकाळचं किर्तन होईल पर्यंत भक्तगणांना शाबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले . यावेळी सप्ताहास्थळी मोठा जनसमुदाय लोटल्याचे दिसून आले . संध्याकाळी ७ वाजता ह भ प प्रकाश महाराज आव्हाड यांचे किर्तन झाले या किर्तनाकरिता मोठा जनसमुदाय लोटल्याचे दिसून आले . सप्ताहा स्थळी रोषणाई बघून भक्तगण भारावून गेल्याचे दिसून आले .
रविवार दि २४ डिसेबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता ह भ प दत्तगिरी महाराज यांच्या किर्तनाने  सप्ताहाची समाप्ती होणार आहे . तरी सप्ताह समाप्तीस पंचक्रोषीतील भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे .
भागवत धर्म हा मानवतेचा संदेश देणारा ग्रंथ असून आपण आध्यामिक संप्रादायात वावरणारे खऱ्या अर्थाने भाविक हे शेतकरीचं असतात.आध्यामिकातून मानवता निर्माण होते तर द्वेष , राग , मत्सर व भांडणे करुन नये ही शिकवण दिली जात आहे . तालुक्यांच्या पुर्व भागात माणिकगिरी सप्ताहास भक्ताचे वलय वाढल्याने  दिवसे – दिवस लोकांची गर्दी वाढताना दिसत आहे . त्यामुळेचं सप्ताहास महत्व निर्माण होवू लागले आहे .
डॉ सुधीर तांबे ( माजी विधान परिषद आमदार )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed