कोपरगांव । झुंजार न्यूज

स्वयंपाकघरातील भांडी व फ्रिजपर्यंत मोठ्या हौसेने मामा , आई – वडीलांनी सजविलेले रुखवत. डि जे , बँडच्या तालावर नाचणारी वऱ्हाडी मंडळी, अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन बांधव अशा ह्रद्य वातावरणात दृष्टीहिन वधू-वरांचे रेशीमबंध जुळले. डोळ्याने दिसत नसले तरी आपले नातवाईक किंवा आपेष्टासह विवाह सोहळ्याकरता आलेल्या मान्यवरांचे भरभरुन प्रेम पाहून आणि आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांनी वधू-वरांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या दिसून आले .
नांदेड जिल्ह्यातील किनवत तालुक्यातील गोंकुदा येथील कु तेजस्विनी आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव तालुक्यातील चास ( नळी ) येथील सागर दगू निकम या दृष्टीहिन जोडप्याचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला.
तेजस्विनीला वडिल नसून घरी आई , बहीण , भाऊ आहे. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण किनवत ( नांदेड ) येथील सरस्वती विदया मंदिर मध्ये झाले. आता ती एम पी एस सी ची तयारी करत असून तीला आधिकारी होण्याची इच्छा आहे . तिचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत बोधडी अंधशाळेत शिक्षण झाले . तर सागर दगू निकम  याचे श्रीरामपूर येथील न्याप संचलित अंध मुला – मुलीची शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत तर प्रगती विदया मंदिर पुणे येथे इयत्ता आठवी ते दहावी पर्यत त्यानंतर  पुणे येथील मॉर्डन कॉलेज , शिवाजीनगर येथे एम.ए. पर्यत शिक्षण झाले असून संध्या कोपरगांव येथे आय डी बी आय या बँकेत कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे . वेळात वेळ काढून तो ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. घरी आई, वडिल, भाऊ, बहिण असून वडिल शेती करतात. घरच्यांनी त्याला कष्टातून उभे केले आहे.
हा विवाह कोपरगांव तालुक्यातील चास ( नळी ) येथील शुभमंगल कार्यालयात बौद्ध रितीरिवाजाने मान्यवर , नातेवाईक , अंध मित्र परिवार यांच्या उपस्थितीत झाला असून प्रा दिलीप गायकवाड यांनी बौद्ध पद्धतीने हा विवाह लावला . तर मुलगा बौद्ध व मुलगी कोळी समाज्याची असताना सुद्धा या दाम्पत्यांनी अंध पणावर मात उच्च शिक्षण घेवून उच्च अधिकारी बनण्याची इच्छा शक्ती मनाशी बांधत संसाररुपी गाडा सुरु केला या आगळ्या – वेगळ्या सामाजिक विचारसरणीने युवा पिढी आदर्श ठरला असून नवं अंध दाम्पत्यानी समाज्यापुढे एक आदर्श ठेवल्याने हा कुतुहला विषय बनला आहे
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed