सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
पिंपरणे । झुंजार न्यूज
संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर MH 07 सी 9146 ही एसटी बस कोळेवाडी या ठिकाणी काल मुक्कामी गेली होती ती पुन्हा सकाळी संगमनेर कडे खांबा वरवंडी शिबलापुर हंगेवाडी मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरणे पुलावरून खाली कोसळली सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही प्रवासी किरकोळ जखमी झाले नशीब बलोत्तर जवळच असलेल्या ट्रान्सफरवर कोसळली नाही नाहीतर मोठा अनर्थ घडला असता
सदर घटना सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली बस चालक गागरे मनोहर कंडक्टर एस एस बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झाले एसटी बस कोसळली त्यावेळेस बस मध्ये 70 च्या आसपास प्रवासी प्रवास करत होते 48 प्रवासी तिकीटधारी पासवाले 15 ते 20 असतील असे असतील एस एस बर्डे यांनी सांगितले
यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढुमणे साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली व जखमीची चौकशी केली
