
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशी व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आंबेडकरी , दलित व रिपब्लिकन चळवळीला दिशा प्रदान करण्याचं मौलिक कार्य करणारे आदरणीय बाळासाहेब गायकवाड यांचा आज 61 वा वाढदिवसा… निमित्ताने माजी केद्रीय मंत्री , तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय खा शरदराव पवार , केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले व माजी महसूल मंत्री तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आश्वी बु ॥ येथे एकसष्ट्री अभिष्टचिंतन होत असल्याने महाराष्ट्रातील तमाम चळवळीतील कार्यकर्त्यांना याचा मनोमन हर्ष होणारचं .

रिपब्लिकन तथा संघर्षमय हृदय सम्राट ना रामदास आठवले यांचे सक्षम व स्वाभिमानी नेतृत्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वीकारले त्यांच्या विचारासरणी नुसार लोकशाहीचे सामाजिकरण चळवळीमधील अहमदनगर जिल्हयातून विजयराव वाकचौरे , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव यांच्यासह बाळासाहेब गायकवाड हे दलित पँथर पासून आठवले यांचे खद्दे समर्थक बनले . मात्र भारदार व बुलंद आवाजाच्या माध्यमातून सभा जिंकणे हे केवळ बाळासाहेबांनाचं जमले . कलात्मक माध्यमातून भारदार आवाजाची जणू त्यांना दैविक शक्तीचं प्राप्त केली हे वावगे ठरणार नाही .

आयुष्यभर आंबेडकर चळवळीशी व पवार ,आठवले , थोरात घराण्याशी इमान राखणारा एक सच्चा पाईक म्हणून सर्वांनाच ते सुपरिचित आहेत . आंबेडकर चळवळ म्हणून संघर्ष नायक रामदास आठवले व राजकिय क्षितिज म्हणून शरदराव पवार यांच्या विचारांचे वारसदार बाळासाहेब गायकवाड राहिले . महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासात एक पिंपळ पान असून त्यात बाळासाहेब गायकवाड या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. अर्थात प्रखर वक्ता, बुलंद आवाज , संघटक, कार्यकर्ता, पँथर, प्रवक्ता, इत्यादी. होय

बाळासाहेबांच्या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाने समाज मनावर विशेष ठसा उमटविला आहे. त्यांच्या कलात्मक वकृत्वातून अनेक कार्यकर्ते आकर्षित झाले आहेत. फुले-आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या म्हणून सातत्याने पन्नास वर्षापासून सामाजिकत्व व सामाजिक कटिबद्धता जपली . आंबेडकर चळवळीतील रामदास आठवलेसह भाई संगारे , राजा ढाले, अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, दया पवार, अविनाश महातेकर , राजा सरवदे , विजयराव वाकचौरे , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव यांच्याविरहीत बाळासाहेब थोरात , स्व दादा कोंडके , स्व गोविंदराव आदीक , स्व बाळासाहेब विखे , स्व आर आर पाटील , स्व शंकरराव कोल्हे , जयंतराव पाटील , रावसाहेब म्हस्के , प्रसाद तनपुरे आदी बरोबर त्यांनी स्नेही संबंध निर्माण केले .

सामाजिक भान व मूल्यांची जाण असलेले बाळासाहेब आंबेडकरी चळवळीतील एक ‘माईलस्टोन’ आहेत. आंबेडकरी चळवळी सह आपल्या प्रखर वकृत्वातून विविध स्तरावर प्रभाव निर्माण केला आहे त्यातील एक महत्त्वाचं स्थान निर्माण करणारे एक बलुंद व आक्रमक नेतृत्व होय भेदक वास्तव मांडून चौफेर नस बंदी करणारे बाळासाहेबांची ओळखत निर्माण झाली आहे तर अंधारयुगातून भीम-सूर्याच्या ‘प्रकाश वाटेने’ जीवनाचे कल्याण होणार आहे यावर त्यांचा दृढ विश्वास असून आपल्या कुटुबांतील बाबा यास अध्यामिकाचे धडे देवून शिक्षक बनविले तर महेश हा उच्च शिक्षित होवून आश्वी बु ॥ सारख्या व्यापारी व ऐतिहासिक गावातील प्रथम लोकनियुक्त संरपच होवून गावाला विकासात्मक दिशेला घेवून जात ऐतिहासिक व सुंदर असे राम मंदिर बनविण्याचे भाग्य मिळाले तर गणेश यास उच्च शिक्षण देवून परदेशात जावून नोकरी करण्याची संधी मिळवून दिली मात्र त्यांचा कल हे सामाजिक व राजकिय क्षेत्राकडे वळू लागले कुटुबांसह तीन मुलांना सुसस्कृत मार्ग दाखवून त्यांना त्यांची दिशा ठरवून दिली .



पँथर , रिपब्लिकनच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःला झोकून देऊन अथक कार्य करण्याचा संकल्प पूर्ण करत सामाजिक व राजकिय क्षेत्रात अनेक चढ-उतार आले मात्र विचाराशी ठाम राहिले . शरदराव पवार यांच्यासह अनेक राजकिय नेत्याशी जवळीक राहून ही त्यांनी आंबेडकर चळवळीशी व रिपब्लिकनशी फारकत घेतली नाही मात्र काही काळ रिपब्लिकन पँथर पक्षाची स्थापना करुन आपली आगळी – वेगळी ओळख निर्माण केली मात्र तेथे आठवले शिवाय मन रमले नाही पुन्हा स्वगृही परतले .

“आम्ही सत्ताधारी होण्यासाठी प्रथमतः सत्ताधारी होण्याची मानसिकता करणे गरजेचे आहे” यासाठी आम्हाला राजकीय भूमिका निश्चित करावी लागणार आहे. ही विचारधारा घेवून आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ बनले . बाळासाहेब गायकवाड एक माणूस म्हणून अंतर्बाह्य पारदर्शक आहेत. त्यांचा सहज सरळ स्वभाव, साधी राहणीमान व ध्येयवादी उच्च विचाराने सामाज्यात खूप आदराचे स्थान प्राप्त केले आहे. आज त्यांचा नाबाद 61 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त बाळासाहेब गायकवाड यांना हार्दिक अभिष्टचिंतन व त्यांच्या भविष्यकालीन सर्व उपक्रमांना मंगल कामना ! राजेंश गायकवाड
