आंबेडकरी चळवळीची गाथा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. त्या चळवळीत ‘माणूस’ हा केंद्रबिंदू मानला गेला. मानवतेची भाषा अन् स्वाभिमानाचं जगणं यासाठी लागणारी ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचं काम आंबेडकरी चळवळीनं केलं. त्या चळवळ आकाशातील एक लखलखता तारा म्हणजे संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ या ऐतिहासिक व अध्यामिक असणार्‍या व प्रवरातिरावरील गांवातील  स्वातंत्र्य सैनिक , आदर्श शिक्षक तथा अध्यामिक क्षेत्रातील ह भ प नामदेव गायकवाड यांच्या सानिध्यात वाढलेले बाळासाहेब नामदेव गायकवाड हे होय .

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेशी व रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष तथा केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील  आंबेडकरी , दलित व रिपब्लिकन चळवळीला दिशा प्रदान करण्याचं मौलिक कार्य करणारे आदरणीय बाळासाहेब गायकवाड यांचा आज 61 वा वाढदिवसा… निमित्ताने  माजी केद्रीय मंत्री , तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय खा शरदराव पवार , केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले व माजी महसूल मंत्री तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आश्वी बु ॥ येथे एकसष्ट्री अभिष्टचिंतन होत असल्याने महाराष्ट्रातील तमाम चळवळीतील कार्यकर्त्यांना याचा मनोमन हर्ष होणारचं .

रिपब्लिकन तथा संघर्षमय हृदय सम्राट ना रामदास आठवले यांचे सक्षम व स्वाभिमानी नेतृत्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वीकारले त्यांच्या विचारासरणी नुसार लोकशाहीचे सामाजिकरण चळवळीमधील अहमदनगर जिल्हयातून विजयराव वाकचौरे , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव यांच्यासह बाळासाहेब गायकवाड हे दलित पँथर पासून आठवले यांचे खद्दे समर्थक बनले . मात्र भारदार व बुलंद आवाजाच्या माध्यमातून सभा जिंकणे हे केवळ बाळासाहेबांनाचं जमले . कलात्मक माध्यमातून भारदार आवाजाची जणू त्यांना दैविक शक्तीचं प्राप्त केली हे वावगे ठरणार नाही .

आयुष्यभर आंबेडकर चळवळीशी व पवार ,आठवले , थोरात घराण्याशी इमान राखणारा एक सच्चा पाईक म्हणून सर्वांनाच ते सुपरिचित आहेत . आंबेडकर चळवळ म्हणून संघर्ष नायक रामदास आठवले व राजकिय क्षितिज म्हणून शरदराव पवार यांच्या विचारांचे वारसदार बाळासाहेब गायकवाड राहिले . महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासात एक पिंपळ पान असून त्यात बाळासाहेब गायकवाड या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. अर्थात प्रखर वक्ता, बुलंद आवाज , संघटक, कार्यकर्ता, पँथर, प्रवक्ता, इत्यादी. होय

बाळासाहेबांच्या कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाने समाज मनावर विशेष ठसा उमटविला आहे. त्यांच्या कलात्मक वकृत्वातून अनेक कार्यकर्ते आकर्षित झाले आहेत. फुले-आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या म्हणून सातत्याने पन्नास वर्षापासून सामाजिकत्व व सामाजिक कटिबद्धता जपली . आंबेडकर चळवळीतील रामदास आठवलेसह भाई संगारे , राजा ढाले, अरुण कांबळे, नामदेव ढसाळ, दया पवार, अविनाश महातेकर , राजा सरवदे , विजयराव वाकचौरे , अशोकराव गायकवाड , श्रीकांत भालेराव यांच्याविरहीत बाळासाहेब थोरात , स्व दादा कोंडके , स्व गोविंदराव आदीक , स्व बाळासाहेब विखे , स्व आर आर पाटील , स्व शंकरराव कोल्हे , जयंतराव पाटील , रावसाहेब म्हस्के , प्रसाद तनपुरे आदी बरोबर त्यांनी स्नेही संबंध निर्माण केले तर विजय हिंगे , सुरेंद्र थोरात , पप्पू बनसोडे , आशिष शेळके , राहुलज -हाड  . महेश गायकवाड यांना राजकारणाची दिशा देत प्रोसाहित केले 

सामाजिक भान व मूल्यांची जाण असलेले बाळासाहेब आंबेडकरी चळवळीतील एक ‘माईलस्टोन’ आहेत. आंबेडकरी चळवळी सह आपल्या प्रखर वकृत्वातून विविध स्तरावर प्रभाव निर्माण केला आहे त्यातील एक महत्त्वाचं स्थान निर्माण करणारे एक बलुंद व आक्रमक नेतृत्व होय भेदक वास्तव मांडून चौफेर नस बंदी करणारे बाळासाहेबांची ओळखत निर्माण झाली आहे तर अंधारयुगातून भीम-सूर्याच्या ‘प्रकाश वाटेने’ जीवनाचे कल्याण होणार आहे यावर त्यांचा दृढ विश्वास असून आपल्या कुटुबांतील बाबा यास अध्यामिकाचे धडे देवून शिक्षक बनविले तर महेश हा उच्च शिक्षित होवून आश्वी बु ॥ सारख्या व्यापारी व ऐतिहासिक गावातील प्रथम लोकनियुक्त संरपच होवून गावाला विकासात्मक दिशेला घेवून जात ऐतिहासिक व सुंदर असे राम मंदिर बनविण्याचे भाग्य मिळाले तर गणेश यास उच्च शिक्षण देवून परदेशात जावून नोकरी करण्याची संधी मिळवून दिली मात्र त्यांचा कल हे सामाजिक व राजकिय क्षेत्राकडे वळू लागले कुटुबांसह तीन मुलांना सुसस्कृत मार्ग दाखवून त्यांना त्यांची दिशा ठरवून दिली .

जागतिक पातळीवर ज्या चळवळीची नोंद झाली ती भारतातील ‘दलित पँथर चळवळ’ तसेच  ‘बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘रिपब्लिकन चळवळ’, ‘भूमिहीनांची चळवळ’, ‘रिडल्सचा लढा’, ‘मंडल आयोग’, ‘नामांतर आंदोलन’, ‘आंबेडकर भवन’, ‘इंदुमील आंदोलन’, ‘भिमा-कोरेगाव आंदोलन’ इत्यादि मध्ये त्यांनी आपले मौलिक योगदान दिलेले आहे. महाराष्ट्रातील आक्रमक कार्यकर्ता हे कदापी विसरू शकणार नाहीत. आंबेडकर चळवळीसह समाजकारण व राजकारणात कठोरपणे कृतिशील भूमिका बजावत एक नाविन्यपूर्ण ओळख निर्माण त्यांनी केली आहे. 


आंबेडकरवादी प्रतिमा कायम राहावी म्हणून संघर्षशील पणे तळमळीने काम केले चळवळीशी तडजोड न करता आपली भूमिका ठाम ठेवली . त्याचा त्रास ही झाला, तर मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये भाग घेत आपल्या इराद्या पासून ते कधी ही विचलित झाले नाहीत.

पँथर , रिपब्लिकनच्या प्रत्येक आंदोलनात स्वतःला झोकून देऊन अथक कार्य करण्याचा संकल्प पूर्ण करत सामाजिक व राजकिय क्षेत्रात अनेक चढ-उतार आले मात्र विचाराशी ठाम राहिले . शरदराव पवार यांच्यासह अनेक राजकिय नेत्याशी जवळीक राहून ही त्यांनी आंबेडकर चळवळीशी व रिपब्लिकनशी फारकत घेतली नाही मात्र काही काळ रिपब्लिकन पँथर पक्षाची स्थापना करुन आपली आगळी – वेगळी ओळख निर्माण केली मात्र तेथे आठवले शिवाय मन रमले नाही पुन्हा स्वगृही परतले . 

 “आम्ही सत्ताधारी होण्यासाठी प्रथमतः सत्ताधारी होण्याची मानसिकता करणे गरजेचे आहे” यासाठी आम्हाला राजकीय भूमिका निश्चित करावी लागणार आहे. ही विचारधारा घेवून आंबेडकरी चळवळीचे ‘ऊर्जा स्त्रोत’ बनले . बाळासाहेब गायकवाड एक माणूस म्हणून अंतर्बाह्य पारदर्शक आहेत. त्यांचा सहज सरळ स्वभाव, साधी राहणीमान व ध्येयवादी उच्च विचाराने सामाज्यात  खूप आदराचे स्थान प्राप्त केले आहे. आज त्यांचा नाबाद 61 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त बाळासाहेब गायकवाड यांना हार्दिक अभिष्टचिंतन व त्यांच्या भविष्यकालीन सर्व उपक्रमांना मंगल कामना ! 

राजेंश गायकवाड

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed