कोल्हार । झुंजार न्यूज
आशा व गट प्रवर्तक यांचा ऑनलाईन कामावर पुन्हा बहिश्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने घेतला आहे त्याचाच भाग म्हणून आज कोल्हार येथील प्राथमीक आरोग्य केंद्रामध्ये ऑनलाईन काम करणार नसल्या बाबदचे निवेदन कोल्हार प्राथमीक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकारी स्वीटी गायकवाड मॅडम यांना आशा सुपरवायझर रेणुका निर्मळ व वर्षा मांडुळे यांच्या सह आशा कर्मचारी यांनी दिले अशी माहीती आयटकचे राज्य कौंसील सदस्य कॉ . सुरेश पानसरे यांनी दिली.
आशांनी व गट प्रवर्तकांनी त्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी दिनांक 18/10/2023 ते 9/11/2023 या कालावधीत संप पुकारला होता या संपाच्या पार्श्वभुमीवर मा. आरोग्यमंत्री ना. तानाजी सावंत यांनी कृती समीतीच्या पदाधीकारी सोबत बैठक घेतली होती सदर बैठकीत आरोग्य मंत्री यांनी आशांना व गट प्रवर्तकांना दिवाळी बोनस दोन हजार रु. दिवाळी पुर्वी देण्यात येनार
आशा स्वयंसेविकेच्या मोबदल्यात रु. ७००० चि वाढ करनार गट प्रवर्तकांच्या मोबादल्यात ६२०० चि वाढ देणार संप काळातील काम पुर्ण केले तर संप काळातील मोबदला देण्यात येणार असे आश्वासन मा. आरोग्य मंत्री यांनी दि. १ / ११ / २०२३ रोजी आरोग्य भवन मुंबई येथे घेतलेल्या बैठकीत कृती समीतीला दिले होते. यातील कुठलेही आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी पुर्ण केले नाही.
पहीला संप स्थगीत होऊन दिड महीना होऊन गेला परंतु शासनाने दिलेले आश्वासन पुर्ण केले नाही.
मा. आरोग्य मंत्र्यांना कृती समीती च्या वतीने नागपुरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून . शासननिर्णय त्वरीत काढण्याची विनंती केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. परीनामी राज्यातील आशावर्कर व गटप्रवर्तक यांच्या मनामध्ये शासना विषई प्रचंड चिड निर्मान झाली आहे. त्यामुळे दिनांक २९ / १२ / २०२३ पासून आशा व गट प्रवर्तक ऑन लाईन कामावर बहिष्कार टाकत आहे.
वरील मंजुर केलेल्या मागण्या शासननिर्णय दि. १२ / १ / २०२४ पूर्वी निर्गमीत करण्यात यावेत अन्यथा दि. १२ / १ / २०२४ पासुन राज्यातील सर्व आशा कर्मचारी व सुपरवायझर बेमुदत संपावर जातील . असे कृती समतीने शासनास कळवीले आहे.
यावेळी सौ रेणुका निर्मळ सौ. वर्षा मांडुळे या सुपरवायझर तर अश्विनी गोसावी सोनाली शेजुळ ज्योती थोरात शोभा शिंदे सविता राजभोज निर्मला राजभोज कल्पणा गागरे वेषाली भोंडे अनिता शेळके विमल भोसले चंद्रकला लोखंडे मंगल बर्डे या सह असंख्य आशा कर्मचारी उपस्थीत होत्या.
