आश्वी । झुंजार न्यूज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकीकडे देश तर दुसरीकडे गोर गरिब कष्टकरी , शेतकरी , दुर्बल व मागस समाज्याला उभे करण्याचे काम केले त्यातून त्यांनी सामाजिक व राजकिय चळवळीकरिता दादासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक माणसे घडविले होते आज बाबासाहेब नसले तरी त्याचा विचार घेवून अनेक कार्यकर्ते समाज्यात चळवळीचे प्रामाणिकपणे व चांगले काम करताना दिसत त्यातील बाळासाहेब गायकवाड हे एक असल्याचे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पदमभूषण शरदराव पवार व्यक्त केले

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु॥ येथील रिपाई जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या एकसष्टी अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी शरदराव पवार हे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे होते . तर डॉ सुधीर तांबे , आ प्राजक्ता तनपुरे , रावसाहेब म्हस्के , आ .सत्यजीत तांबे , विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , प्रकाश गजभिये ,राजेंद्र फाळके , रणजीत सिंह देशमुख , राजेंद्र चकोर , सौ दुर्गाताई तांबे , अरुण कडू , सुधीर म्हस्के , सोमनाथ जोंधळे , गणपत सांगळे , अशोकराव गायकवाड , नवनाथ आंधळे , माधवराव कानवडे , सुरेंद्र थोरात , माणिकराव यादव , आशिष शेळके , कैलास कासार , पप्पू बनसोडे , विजय हिंगे , राहुल ज-हाड , महेंद्र गायकवाड , महेश गायकवाड , गणेश गायकवाड , सुरेश थोरात , संरपच नामदेव शिंदे , उपसंरपच सौ अरुणा हिंगे , दाऊद शेख आदीसह मोठया संख्येने परिसरातून कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थित होते .

यावेळी शरदराव पवार पुढे म्हणाले की , बऱ्याचं वर्षातून मी या परिसरात येत आहे हेखरे असले तरी मी ५६ साली येथे आलो ते शिक्षणाकरिता तेव्हा मी ९ वी शिकत होतो त्यामुळे या परिसरातील सर्व गांव माझ्या परिचित आहे येथील शेती व शेतकऱ्यांची कामे जवळून बघितली .

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन वेगळ्या पध्दतीचे होते त्यांनी देशासाठी घटना , सविधान विचारपुर्व दिली . तर स्वतंत्र्या आधी पडीत जवाहरलाल यांना पाणी व विदयुत निर्मिती महत्व सागितले त्यातून भंडारदरासह राज्यातील दोन तीन पाण्याचं नियोजन करत शेती विज हे महत्वाचे असल्याचे विचार बाबासाहेबानी दिले . यातून ही संकल्पना पंजाब हरियानासह अनेक राज्यात राबविण्यात आली तर हाचं विचार देशात गेला .

बाबासाहेबांचे विचार घेवून जागृत कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशात व राज्यात चळवळ उभी केली तर भविष्यात . कॉग्रेस – रिपाई युती ही बाबासाहेबांच्याचं विचारातून झाली . बाळासाहेब गायकवाड सर्व सामान्य कार्यकर्ता पण समाज्याच्या तळमळीतून लोकांमध्ये राहत व लोकांचा विचार करुन काम करत आहे , त्यांनी कधी मतभेद होवून दिले नाही जिल्हा नियोजन समितीतुन जिल्ह्यातील प्रश्न मांडले जिल्हयाचं अधिकाऱ्यांशी चांगले संबध ठेवले व्यक्तीगत स्वार्थ कधी बघितला नाही . लोकासाठी ज्यांनी आयुष्य दिले ते आयुष्य व्यर्थ जात नाही त्यांच्यातील गुण हेरले . कुटुब , समाज लहान असला तरी त्यांचे काम कार्य चांगले राहते .

यावेळी आ बाळासाहेब थोरात म्हणाले की , इतिहास अनेक कार्यक्रम पाहिले , पवार यांचे वैशिष्टेय म्हणजे जिवा – भावाचा कार्यकर्ता शोधणे , त्यांना जपणे पवार ८४ साली ४० वर्षानंतर पुन्हा एकदा आले . बैलगाडी चालवणारा आज संरपच हे वैशिष्टेय जनतेचे आहे . गांव , माणसे परिचित असणारे नेते आहे . बाळासाहेबांचे गुण शोधून निवेदनातून वक्ता झाला . वाकडे – तिकडे बोलणाऱ्याच्या विरोधात बाळासाहेबांचं औषध होय . मतभेद झाले तर सामंजस्यपणाने सोडूविणे कधी तेड निर्माण न होणे. सत्ताच्या पाठीशी उभे राहणे त्याचे वैशिष्टेय , अविस्मरणीय हा कार्यक्रम आहे .

बाळासाहेब गायकवाड सत्कारा उत्तर देताना म्हणाले की , बाबासाहेब , आ ई – वडीलांसह आदरणीय पवार हे माझे दैवत आहे . भोंगा फुकणार्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या पवार यांच्या हस्ते हा खरा माझा सन्मान होय , नामातंर मंडळ आयोग , महीला पहिले पवार यांचे काम हिमालया पेक्षा मोठे , मायभुमी तुम्हाला शब्द सेवा करण्याची संधी दयावी . ज्याला जात नावाची वस्तु शिवत नाही त्याला वंदणीय म्हणतात . कार्यकर्त्याच्या आरोग्य जपतात पवार साहेब बरे झाले मला काय दिले नाही तर दिलेले आता पळून गेले , गेल्याना भवितव्य नाही विश्वगुरु जर साहेबांचे शिष्य मग मी सुद्धा शिष्य आम्ही गुरुबंधू तुम्ही ठरवा कोणाला निवडून आणयाचे भिमा – कोरेगांव नंतर शौर्य स्तंभ राममंदिर बांधण्याचा ठेका फक्त भाजपा नाही आम्ही सुद्धा आम्हीत बांधले .

यावेळी अशोकराव गायकवाड म्हणाले की , संघर्षला सामोरे जाणारा कार्यकर्ता , पवार साहेब आले की संघर्षाचे धागे उचलेले जातात . तुमची भुमिका म्हणजे आंबेडकरी विचाराचे आहे

यावेळी डॉ सुधीर तांबे आ . सत्यजीत तांबे आ.प्राजक्त तनपुरे , रावसाहेब म्हस्के , श्रीकांत भालेराव आदीचे भाषणं झाले
बाळासाहेब गायकवाड यांचा सहपत्नी वैशालीताई अभिष्टचिंतन सन्मान जेष्ठ नेते शरदराव पवार , बाळासाहेब थोरात व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . तसेच मान्यवरांचा आश्वी ग्रामपचायतीच्या व रिपाईच्या वतीने एकत्रित सत्कार करण्यात आला .
यावेळी बाळासाहेब गायकवाड यांनी देहदान करण्याचा संकल्प त्याबाबतचे पत्र शरदराव पवार यांच्या हस्ते आ बाळासाहेब थोरात व डॉ सुधीर तांबे यांच्याकडे सर्पुर्त करण्यात आले
यावेळी प्रास्ताविक विजय हिंगे यांनी केले तर आभार राहुल ज-हाड यांनी मानले .
