आश्वी | झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व बालआनंद मेळावा हे कार्यक्रम मोठया उत्सवात साजरे करण्यात आले.

 

ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री सन्माननीय प्रियांका नागरे , मानवाधिकार फाउंडेशनच्या सचिव, पत्रकार व शिक्षिका सन्माननीय रेणुका दिघे व अश्वी खुर्द केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख सन्माननीय श्री घुले हे उपस्थित होते.

 

 विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री शिवाजी सोसे सर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री नारायण दादा नागरे, गावचे सरपंच सन्माननीय श्री राजेंद्र बर्डे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष शीतलताई उगलमूगले, तसेच गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, पालक, तरुण, माता पालक, शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक व अध्यक्ष यांनी आपले मनोगतं व्यक्त केले .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *