आश्वी | झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील असणार्या पिंपळगांव देपा शिवारातील मोधळवाडी मधील आदिवाशीच्या असणार्या शेतजमिनीलगत लमान्या पाझर तलावाची भींतीजवळील उत्खन करत निर्माण केलेले शेततळे त्वरीत बंद करुन बुजविण्यात यावे अन्यथा सर्व आदिवाशी समाज ग्रामपचायती समोर बुधवार दि १० जानेवारी २०२४ रोजी बेमुदत उपोषणास बसणार असा इशारा एकलव्य संघटनेने निवेदनाद्रारे तहसिलदारांना दिला आहे .
या निवेदनात पुढे म्हटले की , मोधळवाडी येथे आदिवाशी समाज्याच्या क्षेत्रात परिसराकरिता पाणी उपलब्ध व्हावे याकरिता लमान्या पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली . याच पाझर तलावाजवळ फकिरा मोमीन यांनी जमिन घेत पाझर तलावाच्या शेजारीचं जे सी पी च्या साहय्याने उत्खन करत शेततळे निर्माण केले पाझर तलावाच्या भींतीचा एकाबाजूने आधार घेत शेततळ्याला तीनबाजूने भींत उभी केली भविष्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास भींती तोडल्याने पाण्याची गळती होवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा दाब वाढल्याने शेततळे फुटू शकते यामुळे आदीवाशीच्या वस्त्यांना मोठा धोका निर्माण होवू शकतो तसेचं पाझर तलावाच्या भींतीवरुन आदीवाशी समाज्याची वहीवाट असून भींतचं कोरल्याने रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला .
यापुर्वी याबाबत तक्रार केली असता प्रशासनाने शेततळे त्वरीत बंद करण्याचे आदेश दिले होते . मात्र उत्खनन केले खड्डे व कोरलेली भींत अजून दुरुस्त झालेली नसल्याने मोठा पाऊस झाल्यास धोका निर्माण होईल याबाबत प्रशासन पातळीवर काम बंद करुन दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते मात्र दोन महिन्याचा कालावधी होवून ही पाझर तलावा जवळील शेततळे जैसे थे चं राहिले , भीती जवळील उत्खन केलेली जागा बुजण्यात आली नाही .
तरी संबंधीताना तमान्या पाझर तलाव व परिसर दुरुस्त करण्याचे आदेश दयावे अन्यथा सर्व आदिवाशी समाज्यातील सर्व लोक ग्रामपचायती समोर बेमुदत उपोषणास बसेल असा इशारा एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केरू खरात , बाळासाहेब भानुदास पवार , दिलीप भिकाजी खरात , साहेबराव कोंडीराम खरात , भाऊसाहेब माळी , एकलव्य संघटना टायगर फोर्स उपाध्यक्ष बाळासाहेब पवार , गौतम बाळू पवार , संतोष भानुदास पवार , पिण्या अशोक पवार , एकलव्य संघटना महिला आघाडी अहमदनगर जिल्हा पुनम ताई माळी तसेच एकलव्य संघटना संगमनेर मंदाताई पवार भाऊसाहेब माळी संपर्कप्रमुख तालुका उपाध्यक्ष दीपक बर्डे संतोष बर्डे कार्याध्यक्ष अनिल मोरे गणेश मोरे कुंदन सूर्यवंशी शिवाजी नागरे सतीश माळी नवनाथ माळी अशा सर्व कार्यकर्ते दिला आहे .
