आश्वी | झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील महाराष्ट्रात निर्भीडपणे काम करणारी राष्ट्रीय संघटना मानव सुरक्षा सेवा संघाचा ४ था वर्धापन दिन आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत मधील भगवान महावीर सभागृह येथे संपन्न झाला .

 

यावेळी महापुरुष व संविधानास अभिवादन करून कार्यक्रमास सुरवात झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवानेते विजयराव हिंगे ग्रामपंचायत जेष्ठ सदस्य बबनराव शिंदे प्रदेश अध्यक्ष बशीरभाई भुरे दै.लोकप्रभात संपादक सोमनाथ सोनपाखरे प्रवरचे पाणी संपादक संजय नवले जेष्ठ पत्रकार राजेंद्र साळवे मा.पं.समिती.संगमनेर विरोधी पक्ष नेते सरुनाथ उंबरकर व इतर मान्यवर यांची उपस्थिती लाभली तसेच उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरानी मानव सुरक्षा सेवा संघ हा गोर गरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात खबीर पणे लढा ४ वर्षांपासून देत आहे. या संघटनेच्या माध्यमातून हजारो गोरगरीब जनतेचे शासकीय विविध प्रकरणे मार्गे लागली आहेत संघांच्या पदाधिकारी यांनी अनेक संकटांना तोंड देत गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत या संघटनेने नावलौकिक केले असे प्रतिपादन उपस्थित मान्यवर यांनी केले.

 

यावेळी सूत्रसंचालन पत्रकार गणेश खेमनर व विकास भडकवाड यांनी केले कार्यक्रमानंतर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे राष्ट्रीय सचिव भारत म्हसे 

 

मानव सुरक्षा सेवा संघ यांच्या राष्ट्रीय कार्यालयाला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे यांनी भेट दिली व पत्रकार परिषद पार पाडली

 

यावेळी आश्वी बुद्रुक गावचे सरपंच नामदेव शिंदे गवई गट उत्तर महा.सरचिटणीस किशोर वाघमारे मछिंद्र राखपसरे प्रमोद गायकवाड पुणे जेष्ठ व्यापारी सुशील भंडारी पत्रकार राजेश गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बबनराव शिंदे सदस्य अझरुद्दीन शेख संतोष ताजणे समीर गांधी अमित भंडारी अजिंक्य कराळे पत्रकार थोरात भाऊसाहेब गायकवाड अस्लम शेख राजेंद्र शहाणे सर विलास भंडारी आबासाहेब राखपसरे विशाल राखपसरे मछिंद्र होडगर बाळासाहेब जऱ्हाड मेहबूब शेख अण्णा जाधव मोहित गायकवाड शिवाजी गायकवाड रावसाहेब पंडित भास्कर चकोर दत्तात्रय सांगळे इणूसभाई शेख कैलास गायकवाड समस्त ग्रामस्थ आश्वी बुद्रुक व पत्रकार बंधू उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed