उद्योजगता विकास या विषयावर एन. बी. धुमाळ यांचे व्याख्यान
संगमनेर । झुंजार न्यूज
शिक्षण हा प्रगतीचा महत्वाचा घटक असून सर्वानी शिक्षित होणे हि आता काळाची गरज आहे. थोडक्यात शिक्षित आणि ज्ञानी बना कारण हाच खरा यशाचा गुरूमंत्र असल्याचे प्रतिपादन एन. बी. धुमाळ यांनी केले.
सहकार महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात कला, वाणिज्य व विद्यान महाविद्यालय, संगमनेर येथे सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी बी. बी. ए. या विभाग अंतर्गत उद्योजगता विकास या विषयावर एन. बी. धुमाळ (उद्योजक व लेखक) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलतांना धुमाळ म्हणाले कि , विध्यार्थ्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर, योग्य वेळेचे नियोजन करून प्रामाणिकपणे कष्ट व सातत्य असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन महाविद्यालयीन जीवनामध्ये अभ्यास केला तर ते भविष्यात नक्की यशस्वी होतील. विध्यार्थांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे, तसेच स्वतःची क्षमता ओळखून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडले तर विद्यार्थी हमखास यशस्वी होतो असे मत मांडले.
अतिशय सामान्य परिस्थिती असूनही कष्ट आणि अभ्यासाच्या वाटेची निवड करून शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून यशस्वी उद्योजक म्हणून स्वताला प्रस्तापित केले. त्यानंतरही समाजभान बाळगून शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना स्वतःचा खडतर प्रवास सांगत यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठीचा मूलमंत्र देऊन प्रेरणा देण्याच महत्व पूर्ण काम ते करीत आहेत.
या कार्यक्रमामध्ये उद्योजक धुमाळ यांनी लिहिलेले ‘यशाचे १११ मंत्र’ या पुस्तकाच्या १०१ प्रति महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट देण्यात आल्या. सदर कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी दैनिक युवावार्ताचे संपादक किसनभाऊ हासे यांचे समर्पक मार्गदर्शन मिळाले. स्वखर्चाने विध्यार्थी व समाजाला यशाची वाट व यशस्वी जीवनाची प्रेरणा देन्याच त्याचं कार्य अनमोल आहे, असे उद्गार किसानभाऊ हासे यांनी काढले.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील यांनी केले. महाविद्यालाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ व डॉ. विलास कोल्हे यांचे हि मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रा. जयराम डेरे यांनी मानले.
कार्याक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आबासाहेब पोकळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मन घायवट, प्रा. रोहीणी गुंजाळ, प्रा. नवनाथ नागरे, व इतर शिक्षक व शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
