पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील गावगाठाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन व सर्व समाज्यातील एकत्रिकरणातून आंबेडकरी चळवळीची अस्मिता व प्रतिक मानला जाणाऱ्या ‘ निळ्या ध्वज ‘ फडकविण्यात आला .

 

आंबेडकरी चळवळीत निळ्या ध्वजास त्यागाचे प्रतिक समजले जाते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते. अनेकदा या ध्वजावर ‘जय भीम’ हे शब्द लिहिलेले असतात. तसेच काही ध्वजावर आंबेडकरांचे चित्र सुद्धा असल्याने या ध्वज्यास पवित्र मानले जाते त्यामुळे बहुतांश ठिकाणी तरुणाईने निळ्या ध्वजास एक आदर्शपणा मानून आपले जीवनमय कार्यास सुरुवात केलेली आहे .हेच आदर्श घेवून पानोडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन व मराठा , मुस्लीम , वंजारी , आदीवाशी , माळी समाज्यातील तरुणांनी एकत्र येत आंबेडकरी समाज्याचे प्रतिक असणार्‍या निळा ध्वज मोठया उत्साहात फडकले . 

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन अध्यक्ष अमर कदम , सचिव जय कदम ,  उपाध्यक्ष सुनिल कदम , कार्यअध्यक्ष- श्याम कदम , लक्ष्मण कदम , संकेत कदम ,सूरज कदम , सल्लागार – आशुतोष कदम , अमोल कदम , बाळासाहेब कदम (टेलर) , सुधाकर कदम , खजिनदार गणेश कदम , सदस्य – स्वप्नील कदम , पंकज कदम , आदित्य कदम , विकी कदम , अजय कदम ,  रोहित कदम , महेश कदम , रामराव कदम , सुनिल कदम , प्रवीण कदम , राजू कदम , अंकुश कदम , अशोक कदम , प्रकाश भोसले , अविनाश कदम , अंकुश कदम , रियाज भाई , आयाज अशरफी , इरफान सय्यद , आनंद भालेराव ,  शुभम कदम , फकिरा कदम , प्रशांत थोरात , आदर्श थोरात रिपाई तालुका युवाध्यक्ष योगेश मुन्तोडे , माजी उपसंरपच अशोक तळेकर , रावसाहेब घुगे , नय्युम सय्यद , संजय जाधव , अस्लम सय्यद , मधुकर कदम , भारत शेवाळे , जब्बर अशरफी , पत्रकार राजेंश गायकवाड आदीसह कार्यकर्ते व तरुण उपस्थित होते 

चौकट 

निळा ध्वज जेथे फडविले त्या जागेवर भविष्यात निळ्या ध्वज्यासह , शौर्यस्तंभ व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रासह स्मारक बनविण्याचा निर्धार फाऊंडेशन अध्यक्ष अमर कदम , सचिव जय कदम यांनी व्यक्त केला   
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed