संगमनेर । झुंजार न्यूज
लायन्स क्लब संगमनेर सफायर यांच्यातर्फे मंगळवार दि. १ फेब्रुवारी २०२४ व बुधवार दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता. सफायर आयडल गायन स्पर्धेचे आयोजन मालपाणी लाॅन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे केले आहे.
ही सोलो (वैयक्तिक) गायन स्पर्धा असून लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, संदीप चोथवे, अध्यक्ष अतुल अभंग, सेक्रेटरी जितेश लोढा, खजिनदार कल्पेश मर्दा यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा घेतली जात आहे. प्रा.डाॅ. जितेंद्र पाटील (मो. ९८६०२८६१२३) आणि प्रा.डाॅ. श्रीहरी पिंगळे (मो. ९४२२०८९८०३) हे या स्पर्धेचे प्रक्लप प्रमुख म्हणून काम बघत आहेत.

स्पर्धाची ऑडिशन २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ वा. या वेळेत मालपाणी लाॅन्स, लक्ष्मी रोड, संगमनेर येथे होणार आहे. या ऑडिशन मधून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांनाच १ आणि २ फेब्रुवारी रोजी आपले गाणे सादर करता येणार आहे.

एकूण ५ गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून गट क्र. १ – तिसरी ते पाचवी, गट क्र. २ – सहावी ते सातवी, गट क्र. ३ – आठवी ते दहावी, गट क्र. ४ – महाविद्यालयीन, गट क्र. ५ – खुला गट अशाप्रमाणे रचना केलेली आहे. गट क्र. १ ते ३ यांची स्पर्धा मंगळवार दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार असून गट क्र. ४ ते ५ यांची स्पर्धा बुधवार दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. स्पर्धकांसाठी नाममात्र प्रवेश शुल्क रू. १००/- असणार आहे. प्रेक्षकांसाठी प्रवेश मोफत असल्याचे श्रीनिवास भंडारी यांनी सांगितले.
प्रत्येक गटासाठी एकूण ६ बक्षिसे असून प्रथम क्रमांक रू. १५००/- व ट्राॅफी, द्वितीय क्रमांक रू. ११००/- व ट्राॅफी, तृतीय क्रमांक रू. ७५०/- व ट्राॅफी, चतुर्थ क्रमांक रू. ५००/- व उत्तेजनार्थ २ बक्षिसे प्रत्येकी रू. ३००/- एवढे असणार आहे. प्रत्येक गटातून प्रथम ४ स्पर्धकांचे व्हिडिओ संगमनेर सफायर च्या युट्यूब चॅनेलवर प्रसारीत करण्यात येणार असून जास्तीत जास्त लाईक्स ज्याला मिळतील त्याला पाॅप्युलर ट्राॅफी देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
एका व्यक्तीस एकाच गाण्यात सहभाग घेण्यात येणार असून स्पर्धकांना ४ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
नाव नोंदणीसाठी श्री सिध्दीविनायक काॅर्पोरेशन, बी.एड. काॅलेजसमोर, संगमनेर व कृष्णा टेक्स्टाईल, संगमनेर काॅलेजसमोर, संगमनेर येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. ९८६०२८६१२३, मो. ९४२२०८९८०३ या नंबरवर संपर्क साधावा.
नगर जिल्ह्यातील गायकांसाठी सर्वात मोठा मंच
सफायर आयडल चा मंच नगर जिल्ह्यातील गायकांसाठी सर्वात मोठा मंच असून यामधील यशानंतर अनेक स्पर्धक टीव्ही शोजसाठी पात्र ठरणार आहेत. नानाविध बक्षिसे आणि टॅलेंटचा आनंद लुटण्यासाठी स्पर्धकांनी तसेच प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी केले आहे
