संगमनेर । झुंजार न्यूज
सह्याद्री संस्थेचे, डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
शाळेविषयी उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी त्यातून स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी व आनंददायी वातावरण तयार व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान चालू केले आहे याचेच औचित्य साधून रांगोळी व विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीने 1381 विद्यार्थ्यांची रचना शाळेची प्रतिकृती काढून तयार करण्यात आली. क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर व कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली त्यांना प्रा भिमराज काकड, भारत सोनवने. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वैभव थोरात, अविष्कार थोरात, जागृती थोरात यांनी सहकार्य केले.
यावेळी प्राचार्य साहेबराव कोल्हे यांनी आपल्या प्राचार्य संदेशामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन, शिक्षणात प्रेरणादायी व पर्यावरण पूरक वातावरण तयार करणे शाळेचे शिक्षक, माजी विद्यार्थी व सर्व पालक यांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेचा विकास झाला तर विद्यार्थ्यांचा विकास होईल विद्यार्थ्यांचा विकास झाला तर त्याचा फायदा या प्रगत देशासाठी नक्कीच होईल हाच या मागचा मुख्य उद्देश आहे असे आवर्जून आपल्या भाषणात म्हटले.
