राज्यात रिपाईला सत्तेत पुरेसा वाटा न मिळाल्यांची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाल्या .

राहुरी । झुंजार न्यूज

महाराष्ट्रात गेली ३ पंच वार्षिक पासून भारतीय जनता पार्टी सोबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी युती केली.या महायु्तीमुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात येण्यास मदत झाली असून ना.आठवलेंच्या भक्कम चळवळीमुळेच त्यांची संपूर्ण भारतात पक्षाच्या रूपाने ताकत वाढली असल्याने थोड्यात दिवसात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात शिर्डीसह किमान २ जागा रिपाईला सोडण्यात याव्यात.अशी प्रमुख मागणी होताना दिसत आहे .

 

राहुरी येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्ह्यातील दक्षिण व उत्तरेतील कार्यकर्त्यांनी एकमुखाने केली आहे.अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी झुंजार न्यूजशी बोलताना दिली आहे.

 

याबाबत विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर व दक्षिण मधील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.आठवले यांच्या आरपीआय गटाची भारतीय जनता पक्षासोबत महायुती असून राज्यातील सरकारही या पक्षाचे एकत्र मिळून काम पहात आहे.मात्र सत्तेत महायुतीतील घटक पक्ष म्हणून सध्या आठवलेंच्या आरपीआय गटाला जेवढे स्थान मिळणे अपेक्षित आहे.ते मिळत नसल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर झालेल्या बैठकीत दिसून आला आहे.असे सांगून वाकचौरे म्हणाले की कार्यकर्त्यांना महायुतीमध्ये शासकीय कमिट्यासह इतर कुठेच पद देऊन काम करण्याची संधी प्राप्त झाली नसल्याने महायुतीतील तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. असेही शेवटी वाकचौरे यांनी सांगितले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *