संगमनेर । झुंजार न्यूज

 

येथील  संगमनेर साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अरविंद  गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतने सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. अरविंद गाडेकर हे ढोलेवाडी ग्रामपंचायत रहिवासी आहेत. मा. शालिनीताई ढोले (लोकनियुक्त सरपंच) यांचे शुभ हस्ते व  सर्व सदस्य व ग्राम विस्तार अधिकारी श्री. आहेर यांचे उपस्थितीत हा सत्काराचा कार्यक्रम झाला.  यावेळी सदस्य शंकर ढोले, संगिता सूर्यवंशी, दत्तात्रय भरितकर, वैशाली ढोले, दारोळे मॅडम, अमोल ढोले, पंकज शिंदे, बुळकुंडे मॅडम व स्वप्निल गुंजाळ आदी उपस्थित होते.
       

 

सत्काराला उत्तर देताना मनोगतात अरविंद गाडेकर म्हणाले, “हा सन्मान संगमनेर साहित्य परिषदचा असून सर्व सभासदांचे प्रतिनिधित्व म्हणून अध्यक्ष नात्याने हा सत्कार स्वीकारत आहे. आपल्याला कार्यक्षेत्रात काही विशेष प्राविण्य किंवा गुणवान व्यक्तींचा सन्मान ग्रामपंचायतने करणे हे अभिनंदनीय आणि कौतुकाचे आहे.ढोलेवाडी ग्रामपंचायतने ते करून दाखविले, मी त्यांचा आभारी आहे.”
       

 

याच बरोबर संगमनेर  साहित्य परिषदेचे पदाधिकारी सहसंघटक प्रा.ज्ञानेश्र्वर  गोंटे सरांचा शाल व बुके देवून सन्मान केला.
 

 

यावेळी ज्ञानेश्र्वर गोंटे म्हणाले,” संगमनेर साहित्य परिषद गेली आठ- दहा वर्षापासून सुरू असून संगमनेर शहरात ही परिषद अनेक साहित्यिक कार्यक्रम घेत आहे. वाचन मंडळ, पसायदान वाचनालय, वक्तृत्व स्पर्धा, मराठी भाषा गौरव दिन व साहित्यविषयक अनेक उपक्रम राबवित आहे. परिषद पुढेही अनेक नव नवीन उपक्रम घेणार आहे.ग्रामपंचायतने साहित्य चळवळीला बळ देण्याकरिता आजचा जो सत्काराचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आभारी आहे.”
     

 

तसेच यावेळी ग्राम विस्तार अधिकारी श्री.आहेर म्हणाले, ” गाडेकर यांचे सामाजिक काम कौतुकास्पद आहे, बेरोजगारांना त्यांनी फॉर्मच्या मध्यमथून मदत केली आहे, साहित्यातील संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्षपद त्यांना मिळाले हे अभिनंदनीय आहे.”  

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *