संगमनेर । झुंजार न्यूज

 

संपूर्ण मध्यमवर्ग महागाईने होरपळतो आहे. अशावेळी त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. महागाईवर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांसाठी व मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही मदत नसणारे हे बजेट पूर्णपणे निराशा जनक असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून सत्ताधारी मीडियाच्या साह्याने हरलेल्या डावाचा जयजयकार करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना आमदार थोरात म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा घोर निराशाजनक आहे.  केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर शेअर बाजारामधील घडामोडी अवलंबून असतात. मात्र यावेळेस शेअर बाजार पूर्णपणे ठप्प आहे.

 संपूर्ण मध्यमवर्ग महागाई मध्ये होरपळत आहे .अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. भरमसाठ वाढलेल्या महागाईवर सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. शेतकऱ्यांना मदत केली असे सांगतात परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत  केलेली नाही.

राज्यांच्या हक्काचे निधी केंद्र सरकारकडे थकलेले आहेत.  त्यातून राज्यांना दिलासा मिळाला नाही .यामुळे या राज्यांना प्रगती करणे सुद्धा अवघड जाणार आहे. एकूणच संपूर्ण निराशजनक असलेला हा अर्थसंकल्प असून सत्ताधारी मात्र हरलेल्या डावाचा जयजयकार मीडियाच्या साह्याने करतील . मात्र जनता पूर्णपणे नाराज आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *