मुंबई । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार जे पी नड्डा यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रा च्या राजकीय घडामोडींवर यावेळी उभयनेत्यांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या किमान दोन जागा देणे आवश्यक आहे.शिर्डी हा राखीव मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी असल्याबाबत या भेटीत ना.रामदास आठवले यांनी खा.जे पी नड्डा यांना माहिती दिली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभलेला रिपब्लिकन पक्ष नोंदणीकृत पक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या दोन जागा निवडून आल्यास रिपब्लिकन पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह मिळून मान्यताप्राप्त पक्ष होईल.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातून शिर्डीसह दोन जागा मिळावे याकरित केद्रींय मंत्री तथा रिपाई अध्यक्ष रामदास आठवले व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जी पी नड्डा या उभयतांमध्ये चर्चा झाली .
