साहेब, आम्ही आपले योगदान विसरणार नाही. जनतेकडून आ.थोरात यांचे प्रति कृतज्ञता

संगमनेर । झुंजार न्यूज

अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि डावा व उजवा कालवा पूर्ण करणारे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हेच खरे जलनायक असून ज्यांनी अडचणी आणल्या ते आता सत्तेच्या जोरावर श्रेय घेऊ पाहत आहे. मात्र धरण आणि कालवे हे फक्त आमदार बाळासाहेब थोरात यांनीच केले असून साहेब आपले योगदान आम्ही कधीही विसरणार नाही असे म्हणत तमाम नागरिकांनी  आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे गावोगावी जंगी स्वागत केले आहे.

निमगाव टेंभी व शिरापूर येथे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उजव्या कालव्याचे जलपूजन करण्यात आले .यावेळी जंगी मिरवणूक ग्रामस्थांनी काढली. याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, तालुकाअध्यक्ष मिलिंद कानवडे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे ,रामदास वाघ, विलास कवडे, बापूसाहेब गिरी ,कैलास पानसरे ,मंदाताई वाघ ,विजय राहणे, बाळासाहेब राहणे, रमेश वर्पे ,नानासाहेब वर्पे, नंदकिशोर शिंदे, शैला पारासुर, योगेश पारासुर, सुशील पारासुर आदींसह पंचक्रोशीतील विविध गावांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण आणि डावा आणि उजवा कालवा पूर्ण करून धरणाचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात आल्याने केलेल्या कामाचे सार्थक झाले आहे. शेतकरी आनंदी होणे. हे आपल्या जीवनातील सर्वात समाधानाची बाब आहे. संगमनेर तालुका हा विकासातून पुढे जातो आहे. येथील सहकार ,शिक्षण, राजकारण ,सर्वधर्मसमभाव हा राज्याला आदर्शवत आहे. विकास कामांमध्ये आपण कधीही राजकारण केले नाही .जनतेची मोठी साथ कायम लाभली आहे. नियतीने आपल्या हातून निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून घेतले आहे.
या कामी अकोले तालुक्यातील जनता व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोठे सहकार्य लाभले. मात्र ज्यांनी कोणतेही योगदान दिले नाही .उलट अडचणी निर्माण केल्या ते लोक आता सत्ता असल्यामुळे श्रेय घेऊ पाहत आहे. मात्र जनतेला काम कोणी केले हे माहित आहे.सध्याचे सरकार हे गोंधळलेले असून राज्यातील जनता त्रस्त आहे .त्यामुळे आगामी काळात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असे सांगताना तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, ज्यांनी कायम निळवंडेला विरोध केला की लोक आता पाणी पुजन आणि श्रेयासाठी पुढे येत आहेत .परंतु हा केवीलवाणी खटाटोप जनता ओळखून आहे. महाराष्ट्रात अनागोंदी वाढली आहे. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. गोळीबार ,अत्याचार, विचारवंतांवर हल्ले या अत्यंत दयनीय अवस्था कधीही नव्हती अशी टीकाही त्यांनी सध्याच्या सरकारवर केली आहे.
तर मिलिंद कानवडे म्हणाले की ज्यांना कालवा आणि धरण माहित नाही ते सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे बातम्या देऊन प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहे.याप्रसंगी डॉ जयश्रीताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे ,रामहरी कातोरे, बापूसाहेब गिरी यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमासाठी निमगाव टेंभी शिरापूर ,वाघापूर ,खराडी या परिसरातील कार्यकर्ते नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
चौकट

धन्यवाद साहेब



उजव्या कालव्याच्या सर्व गावांमधील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे अनेक फलक कार्यकर्त्यांनी लावले आहेत. यामध्ये साहेब आपले योगदान आम्ही कधीही विसरणार नाही. असे सांगताना परिसराच्या वतीने अभिनंदन केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed