नगर । झुंजार न्यूज

 

देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी “गाव चलो अभियानांतर्गत” नगर तालुक्यातील वाळकीसह बहुतांश गावांना भेटी देत सर्वांशी संवाद साधला.

 

यावेळी शैक्षणिक संस्थांना भेट देऊन येथील विद्यार्थ्यांशी शिक्षकाच्या भूमिकेतून चर्चा करत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचबरोबर धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच महिला बचत गट, शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

 

संपूर्ण दिवसभरात आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये देखील सहभाग नोंदवला. यावेळी दिवार लेखन, नागरिकांसमवेत चहा घेत विविध विषयांवर साधलेला संवाद, बचत गटांना प्रातिनिधिक स्वरूपात चेकचे वाटप, महापुरुषांना अभिवादन असे अनेकविध उपक्रम यावेळी संपन्न झाले.

 

या भेटीदरम्यान केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच अद्यापही ज्यांनी या लोकोपयोगी योजनांचा फायदा घेतलेला नाही अशा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन केले व केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माहितीची पुस्तिका वाटप करून या योजनांबाबत माहिती दिली.

 

एकूणच लहानग्यांपासून ते ज्येष्ठ मंडळी पर्यंत सर्वांशी दिलखुलासपणे चर्चा केली. लोकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed