संगमनेर । झुंजार न्यूज
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था संचालित अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने “निर्भय कन्या अभियान-२०२४” शनिवार, दिनांक १० फेब्रुवारी, २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाले.
यावेळी व्याख्यान देण्यासाठी संगमनेर येथील प्रसिद्ध वक्त्या ॲड. मिनल कोते, डॉ. रुता सराफ आणि प्रा. सुरेखा भवर उपस्थित होत्या. ॲड. मिनल कोते यांनी “भारतीय संविधानातील स्त्री संरक्षकत्माक कायदे” या विषयावर मार्गदर्शन केले. संगमनेर येथील डॉ. रुता सराफ यांनी “कर्करोगापासून बचावासाठी उपाययोजना” या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. सुरेखा भवर यांनी योगा प्रात्यक्षिके सादर केली आणि उपस्थित विध्यार्थिनीना स्व-संरक्षणात्मक प्रशिक्षण दिले. “निर्भय कन्या अभियानाच्या आयोजनामुळे विध्यार्थीनीच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.” असे मत कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. जे. चव्हाण यांनी व्यक्त केले. प्रा. पुनम दिघे यांनी या परिषदेचे समन्वयक म्हणून काम केले.
