सावंतवाडी | झुंजार न्यूज

 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे,राज्य विज्ञान संस्था,नागपूर आयोजित 51 वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन 2023-24 चे भव्य आयोजन जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे दिनांक 10 फेब्रुवारी पासून सुरु असून उदघाटनाच्या पहिल्या दिवसापासून श्रेया मुन्तोडेचे संशोधन लक्षवेधी ठरले.

 

तुम्ही मला कागद द्या, मी तुम्हाला सीड बॉल्स देईल, सीड बॉल्स तुम्हाला स्वयंपूर्ण बनवेल. या घोषनेची मान्यवरांनी व विज्ञानप्रेमी नागरिकांनी स्तुती केली.

 

अनुकूल परिस्थितीत बीज अंकुरीत होते व जैविक घटक कालांतराने कुजतात व त्याचे उत्कृष्ट खतात रूपांतरीत होतात. या तत्वाचा उपयोग करून श्रेयाने कागदाचा यशस्वी पुन्हा वापर करण्याचे तंत्र शोधून काढले आहे.

 

शालेय शिक्षण मंत्री ना. दिपक केसरकर यांनी श्रेयाच्या संशोधनाची स्वतः भेट देऊन उपकरणाची माहिती घेतली व तिचे भरभरून कौतुक केले. टाकाऊ कागदापासून पर्यावरण रक्षण, शेतीचा विकास आणि सर्वसामान्य लोकांना आर्थिक आधार मिळणार असल्यामुळे या संशोधनाची राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या संशोधनासाठी श्रेया विज्ञान शिक्षक तिचे वडील अनिल मुन्तोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील सर्व जिल्यातील संशोधक विद्यार्थी यांचा समावेश असून राज्यभरातील शिक्षक, प्रयोगशाळा कर्मचारी, विज्ञानप्रेमी नागरिक आणि राज्यातील विविध शिक्षण संस्था प्रदर्शन पाहण्यासाठी सहली आयोजित करीत आहे.

 

हे प्रदर्शन 14 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed